सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासरी रमली तितिक्षा तावडे, नाशिकमध्ये आहे प्रशस्त घर, शेअर केलेल्या फोटोंमध्ये सासू-सासऱ्यांच्या साधेपणाने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 11, 2024 | 3:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi fame Titeeksha Tawde shared special photos with her mother and father in law

सासरी रमली तितिक्षा तावडे, नाशिकमध्ये आहे प्रशस्त घर, शेअर केलेल्या फोटोंमध्ये सासू-सासऱ्यांच्या साधेपणाने वेधलं लक्ष

छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. तितीक्षाने दोन महिन्यांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. २६ फेब्रुवारी रोजी तितीक्षा व सिद्धार्थ यांचा अगदी शाही पद्धतीने विवाह सोहळा पार  पडला. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  

अशातच या नवविवाहित दाम्पत्याचा नुकताच पहिला गुढीपाडवा साजरा झाला. प्रत्येक नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी पहिला गुढीपाडवा हा कायमच खास असतो आणि तितीक्षा-सिद्धार्थसाठी ही यंदाचा गुढीपाडवा अगदी खास होता. या गुढीपाडव्याचे काही खास फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये तितीक्षाने हिरव्या रंगाची साडी नेसलेली पाहायला मिळत आहे, तर सिद्धार्थने फिकट पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

आणखी वाचा – सामान्य कुटुंबातून आलेल्या अथर्व रुकेची सोशल मीडियावर हवा, ‘डॉन आंटी’च्या व्हिडीओवर सेलिब्रिटीही फिदा, म्हणाले, “भावा कडक…”

यंदाचा हा पहिला गुढीपाडवा तितीक्षाने आपल्या सासरी म्हणजेच नाशिकमध्ये साजरा केला. पहिल्या गुढीपाडव्याच्या या खास फोटोमध्ये तितीक्षाच्या सासरच्या घरची झलक पाहायला मिळत आहे. तितीक्षाचे सासरचे घर हे मोठ्या अपार्टमेंटमध्ये असून घराच्या मोठ्या बाल्कनीमध्ये त्यांनी गुढी उभारली असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर तितीक्षाने या फोटोमध्ये तिच्या सासू-सासऱ्यांसह एक छान सेल्फी फोटोही काढला आहे.

आणखी वाचा – नेत्राच्या हातून अस्तिकाचा अंत, अस्तिकाच्या मृत्यूने विरोचकालाही धक्का, मालिकेला नवीन वळण, आता पुढे काय घडणार?

काही दिवसांपूर्वी तितीक्षाच्या सासूबाईंनी त्यांची लाडकी सून म्हणजेच तितीक्षा तावडे घरी येणार असल्याचा आनंद व्यक्त केला होता. अशातच तितीक्षाच्या या फोटोंनीदेखील तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तितीक्षा सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर सिद्धार्थचा लवकरच ‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ या चित्रपट प्रदर्शित होणार आहे.           

Tags: marathi entertainment newsSatvya mulichi satavi mulgititeeksha tawde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
vicky jain on ankita lokhande

विकी जैनच्या फक्त पैशांवर प्रेम करते अंकिता लोखंडे, नवऱ्यानेच सांगितलं सत्य, म्हणाला, "खरी भांडणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.