‘रामनवमी’ हा सण प्रभू रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो. काही धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान श्रीराम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला झाला होता. म्हणून या दिवसाला रामनवमी असं म्हणतात. रामनवमी फक्त भारताच नाही तर जगभरात साजरी केली जाते. अशातच यावर्षीची रामनवमी हे खास आसणार आहे, कारण येत्या रामनवमीच्या दिवशी दुपारी अभिजीत मुहूर्तावर असाच शुभ योगायोग घडला आहे. ज्या मुहूर्तामध्ये प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता.
यावेळीही रामनवमीला सूर्य मेष राशीत असेल आणि दुपारी दहाव्या भावात असेल. भगवान रामाच्या कुंडलीत शुक्र ग्रह भाग्याच्या घरात असणार आहे. यावेळी रामनवमीलाही हा दुर्मिळ संयोग तयार झाला आहे. यावेळी रामनवमीच्या दिवशी दुपारपासून जन्मलेल्या मुलांमध्ये काही विशेष गुण असतील. तसेच कर्क राशीसह आणखी पाच राशींवर श्रीरामाचा विशेष आशीर्वाद असेल. चला तर जाणून घेऊयात त्या पाच राशी कोणत्या आहेत? याबद्दल…
मेष : भगवान रामाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना काही काळापासून ज्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होता त्या आता दूर होतील. याशिवाय या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती इत्यादीचे सुखदेखील मिळू शकते. या काळात नोकरदार लोकाची पदोन्नती होईल. कौटुंबिक जीवनात सुरू असलेल्या समस्याही प्रभू रामाच्या कृपेने दूर होतील आणि तुमच्या जोडीदाराबरोबरचे नातेही पूर्वीपेक्षा अधिक चांगले होईल.
मकर : प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांची सर्व अडचणींपासून मुक्तता होईल. एका प्रिय व्यक्तीला बऱ्याच काळापासून भेटला नसाल तर ती भेट आता होऊ शकते. प्रगतीच्या नवीन संधीही निराम होतील. या काळात तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर वाढेल. तसेच तुमची संपत्तीही वाढेल.
कर्क : कर्क राशीच्या लोकांवरही रामाचा विशेष आशीर्वाद असेल. श्रीराम यांच्या आशीर्वादाने या काळात काही चांगली संधी मिळू शकते. तसेच, या कालावधीत, आपण एखाद्या व्यक्तीस भेटू शकता. ज्याच्याकडून भविष्यात आर्थिक लाभ होईल. याशिवाय, तुमचे कौटुंबिक जीवनदेखील पूर्वीपेक्षा बरेच चांगले होईल. याशिवाय समाजात तुमचा सन्मान वा आदरही वाढेल.
तूळ : भगवान रामाच्या आशीर्वादाने तूळ राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे आता पूर्ण होतील. जर तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते या काळात पूर्ण होऊ शकते. या काळात पैसे दान करणे तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. गरजू लोकांना मदत केल्यास फायदाच होईल. करिअरमध्ये प्रगतीसाठी काही नवीन संधीही निर्माण होतील.
मीन : मीन राशीच्या लोकांवर भगवान रामाच्या आशीर्वादाने करिअरमध्ये चांगले आणि सकारात्मक परिणाम होतील. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. कुटुंबातही समृद्धी येईल. जुन्या कर्जातून सुटका मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ खूप चांगला आहे. या कालावधीत गुंतवणूक केली तर चांगले फायदे होतील. याशिवाय तुमचे सर्व कौटुंबिक वादही मिटतील.