सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! साखरपुड्यादिवशीच सुप्रसिद्ध अभिनेत्याचा अपघातात दुर्देवी मृत्यू, संसाराची स्वप्न अपूर्णच राहिली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 11, 2024 | 5:42 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Suraj Meher passed away in car accident

धक्कादायक! साखरपुड्यादिवशीच सुप्रसिद्ध अभिनेत्याचा अपघातात दुर्देवी मृत्यू, संसाराची स्वप्न अपूर्णच राहिली अन्...

मनोरंजनसृष्टीतून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. छत्तीसगडमधील अभिनेते सूरज मेहर यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सध्या कलाविश्वात शोकाकुल वातावरण आहे. नारद मेहर या नावाने ओळखला जाणारा सूरज त्याच्या ‘आखरी फैसला’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होता. बुधवारी या चित्रपटाचे शूटिंग आटोपून घरी जात असताना वाटेत त्यांचा एक भीषण अपघात झाला आणि या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागल्याचे समोर येत आहे.

९ एप्रिल रोजी रात्री उशिरा शूटिंगवरून घरी जात असताना त्यांच्या कारची व एका  ट्रकची जोरदार धडक झाली. छत्तीसगडमधील सरसिवा पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरदुला गावाजवळ ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांच्या कारचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले आणि या भीषण अपघातात अभिनेता जागीच ठार झाला. या घटनेनंतर सरसिवा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि अपघातात अडकलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी सूरज यांना मृत घोषित केले.

आणखी वाचा – सासरी रमली तितिक्षा तावडे, नाशिकमध्ये आहे प्रशस्त घर, शेअर केलेल्या फोटोंमध्ये सासू-सासऱ्यांच्या साधेपणाने वेधलं लक्ष

सूरज यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजनसृष्टीतएकच शोककळा पसरली आहे. हा अपघात झाला त्यादिवशीच सूरज यांचा साखरपुडा असल्याचे वृत्तही समोर येत आहे. तसेच मृत अभिनेता (सूरज मेहर) हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सुरजच्या मृत्यूमुळे छलिवुडसह त्याच्या गावात शोककळा पसरली आहे. एका उभरत्या कलाकाराचे अपघाती निधन हे छत्तीसगड चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान असल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा – सामान्य कुटुंबातून आलेल्या अथर्व रुकेची सोशल मीडियावर हवा, ‘डॉन आंटी’च्या व्हिडीओवर सेलिब्रिटीही फिदा, म्हणाले, “भावा कडक…”

दरम्यान, काल (१० एप्रिल) रोजी त्यांचा साखरपुडा होणार होता. ओडिशातील भाटली येथे साखरपुडा पार पडणार होता. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पण अभिनेत्याच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने आनंदाचे रूपांतर दु:खात झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तावर कलाविश्वातील अनेक कलाकारांनी शोकही व्यक्त केला आहे.

Tags: bollywood actordeath newsSuraj Meher
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
paaru serial new promo

अखेर अहिल्यादेवींच्या नजरेत पारूने जागा मिळवली, किर्लोस्करांची गुढी उभारण्याचा मान दिला अन्…; प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.