टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला यांनी खूप कालावधी एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. दोघंही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. लग्नानंतर चार वर्षांनी रुबिनाने जुळ्या मुलींना जन्म दिला. मुलींना जन्म दिल्यानंतर ती बाळंतपण खूप एंजॉय करताना दिसत आहे. याबरोबरच तिने पॉडकास्टदेखील सुरु केला आहे. या पॉडकास्टला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पॉडकास्टमध्ये तिने बाळंतपण व ब्रेस्टफिडिंगबद्दल सल्ले देत असते. रुबिनाने तिचा पॉडकास्ट ‘किसी ने बताया नही’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. (rubina dilaik on breastfeeding)
रुबिना व अभिनव यांना जीवा व एधा या जुळ्या मुली आहेत. त्या आता सव्वाचार महिन्याच्या झाल्या आहेत. पॉडकास्टमध्ये तिने आपल्या मुलींना दूध पाजण्यावरुन एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. दोघींचा जन्म झाल्यानंतर मी अनेक गोष्टी विसरु लागले आहे. यासाठी तिने एक डायरी मेंटेन केली असून मुलींना दूध पाजण्याची वेळ लिहून ठेवते.
रुबिनाच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच आई झालेली सुगंधा मिश्रा पोहोचली होती. तेव्हा ती सुगंधाला म्हणाली की, “मी आता तुला काहीतरी सांगणार होते. पण मला नेमके काय सांगायचे होते याचा मी फक्त विचारच करत राहिले. कधीकधी डोक्यातलं सर्वकाही निघून जाते. काहीही लक्षात राहत नाही. सुरुवातीच्या काळात माझा खूप गोंधळ व्हायचा. मी नक्की कोणाला दूध पाजले आहे हे लक्षात राहायचे नाही. त्यामुळे नंतर मी हे सर्व एका डायरीमध्ये लिहू लागले. जसे की पावणेतीन वाजता मी जीवाला दूध पाजले आणि साडेतीन वाजता जीवाला दूध पाजले असे लिहून ठेवते. असे जर लिहून ठेवले नाही तर मी पूर्णपणे विसरून जाते की मी कोणाला दूध पाजले आहे ते”.
तसेच या पॉडकास्टमध्ये रुबिनाने तिच्या आईचे देखील आभार मानले आहेत. आईबद्दल ती म्हणते की, “माझी आई माझ्याबरोबर आहे त्यामुळे मला तिची खूप मदत मिळत आहे. माझ्या मनांत तिच्याबद्दल सन्मान वाढला आहे. माझ्या आईला परत जायचे होते पण लहान मुलीप्रमाणे मी थांबवले”. यामुळे रुबिना आपल्या कुटुंबामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
रुबिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आता ती ‘चल भज चलीये’ या पंजाबी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २०२४ साली प्रदर्शित होणार आहे.