गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दूध पाजायलाही विसरते आणि…”, जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर रुबिना दिलैकची अशी झाली आहे अवस्था, म्हणाली, “लिहून ठेवते की…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 10, 2024 | 2:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rubina dilaik on breastfeeding

"दूध पाजायलाही विसरते आणि...", जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर रुबिना दिलैकची अशी झाली आहे अवस्था, म्हणाली, "लिहून ठेवते की..."

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला यांनी खूप कालावधी एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. दोघंही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात.  लग्नानंतर चार वर्षांनी रुबिनाने जुळ्या मुलींना जन्म दिला. मुलींना जन्म दिल्यानंतर ती बाळंतपण खूप एंजॉय करताना दिसत आहे. याबरोबरच तिने पॉडकास्टदेखील सुरु केला आहे. या पॉडकास्टला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पॉडकास्टमध्ये तिने बाळंतपण व ब्रेस्टफिडिंगबद्दल सल्ले देत असते. रुबिनाने तिचा पॉडकास्ट ‘किसी ने बताया नही’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. (rubina dilaik on breastfeeding)

रुबिना व अभिनव यांना जीवा व एधा या जुळ्या मुली आहेत. त्या आता सव्वाचार महिन्याच्या झाल्या आहेत. पॉडकास्टमध्ये तिने आपल्या मुलींना दूध पाजण्यावरुन एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. दोघींचा जन्म झाल्यानंतर मी अनेक गोष्टी विसरु लागले आहे. यासाठी तिने एक डायरी मेंटेन केली असून मुलींना दूध पाजण्याची वेळ लिहून ठेवते.

आणखी वाचा – “जवळपास महिना झाला ताप आणि…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं आजारपण, प्रकृतीबाबत दिली माहिती, म्हणाली, “मध्येच मला…”

View this post on Instagram

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

रुबिनाच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच आई झालेली सुगंधा मिश्रा पोहोचली होती. तेव्हा ती सुगंधाला म्हणाली की, “मी आता तुला काहीतरी सांगणार होते. पण मला नेमके काय सांगायचे होते याचा मी फक्त विचारच करत राहिले. कधीकधी डोक्यातलं सर्वकाही निघून जाते. काहीही लक्षात राहत नाही. सुरुवातीच्या काळात माझा खूप गोंधळ व्हायचा. मी नक्की कोणाला दूध पाजले आहे हे लक्षात राहायचे नाही. त्यामुळे नंतर मी हे सर्व एका डायरीमध्ये लिहू लागले. जसे की पावणेतीन वाजता मी जीवाला दूध पाजले आणि साडेतीन वाजता जीवाला दूध पाजले असे लिहून ठेवते. असे जर लिहून ठेवले नाही तर मी पूर्णपणे विसरून जाते की मी कोणाला दूध पाजले आहे ते”.

आणखी वाचा – “लग्न लपवून ठेवण्याचा…”, लग्न केल्यानंतर तापसी पन्नूचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, “मी मानसिकरित्या…”

तसेच या पॉडकास्टमध्ये रुबिनाने तिच्या आईचे देखील आभार मानले आहेत. आईबद्दल ती म्हणते की, “माझी आई माझ्याबरोबर आहे त्यामुळे मला तिची खूप मदत मिळत आहे. माझ्या मनांत तिच्याबद्दल सन्मान वाढला आहे. माझ्या आईला परत जायचे होते पण लहान मुलीप्रमाणे मी थांबवले”. यामुळे रुबिना आपल्या कुटुंबामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

रुबिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आता ती ‘चल भज चलीये’ या पंजाबी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २०२४ साली प्रदर्शित होणार आहे.

Tags: abhinav shuklabreastfeedingrubina dilaiktwin baby
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Bhagyashree Mote Troll

"खासगी आयुष्य चव्हाट्यावर का आणता?", साखरपुड्याच्या दीड वर्षांनंतर लग्न मोडल्यावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले, "लग्न म्हणजे खेळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.