गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जवळपास महिना झाला ताप आणि…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं आजारपण, प्रकृतीबाबत दिली माहिती, म्हणाली, “मध्येच मला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 10, 2024 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jui Gadkari Health Update

"जवळपास महिना झाला ताप आणि…", 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीचं आजारपण, प्रकृतीबाबत दिली माहिती, म्हणाली, "मध्येच मला…"

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेतील सायली अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. या मालिकेतील सायली या पात्रामुळे अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत पोहोचली. या मालिकेमुळे जुईला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. जुईचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Jui Gadkari Health Update)

मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक असलेल्या जुईला बरीच लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती इन्स्टाग्रामवर सेशन आयोजित करुन चाहत्यांशी गप्पा मारत असते. अशातच अभिनेत्रीने ‘क्वीक चॅट, लेट्स डू इट’ असं म्हणत चाहत्यांसह संवाद साधला. यावेळी जुईने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

आणखी वाचा – दिड वर्षांपूर्वी हृतिक रोशनच्या मेकअप मॅनबरोबर झालेला साखरपूडा, लग्नापूर्वीच सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मोडला संसार, म्हणाली, “आम्ही दोघंही…”

या संवादात एका चाहत्याने जुईला विचारले की, “दीदी तू आजारी आहेस का, ‘ठरलं तर मग’मध्ये आवाज वेगळा येतो आहे”. चाहत्यांच्या या प्रश्नावर जुईने उत्तर देत असे म्हटले आहे की, “हो, घसा खूप खराब झाला आहे आणि थोडासा तापही आहे. जवळपास महिना झाला असेल”. याशिवाय आणखी एका चाहत्याने विचारलं की, “तुमची तब्येत बरी झाली का?”. यावर अभिनेत्रीने उत्तर देत म्हटलं की, “अजून तब्येतीत सुधारणा होत आहे, मध्येच मी म्युट मोडमध्ये जात आहे”.

आणखी वाचा – “लग्न लपवून ठेवण्याचा…”, लग्न केल्यानंतर तापसी पन्नूचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, “मी मानसिकरित्या…”

जुईवर चाहते भरभरुन प्रेम करतात. शांत, सौम्य, मनमिळावू असा जुईचा स्वभाव चाहत्यांना फार आवडतो. जुईदेखील रील व्हिडीओ करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या मालिकेत जुई म्हणजेच सायली व अर्जुनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. मात्र अर्जुनची जुनी मैत्रीण आल्याने मालिकेत काही ट्विस्ट येणार का याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.

Tags: jui gadkariJui Gadkari Health Updatemarathi actresstharal tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
rubina dilaik on breastfeeding

"दूध पाजायलाही विसरते आणि…", जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर रुबिना दिलैकची अशी झाली आहे अवस्था, म्हणाली, "लिहून ठेवते की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.