नव्वदच्या दशकातील एक सुपरहिट व लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘मिस्टर इंडिया.’ आजही या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. १९८७ साली आलेल्या या प्रेक्षकांच्या मनावर मोहर उमटवली होती. आजही हा चित्रपट अनेकांच्या आठवणीत आहे. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा सुरू आहे. तर या चित्रपटाशी संबंधित एक मजेशीर किस्सा आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी चित्रपटाचा एक सीन शूट करण्यासाठी चक्क झुरळाला दारु पाजली होती. याचा खुलासा खुद्द शेखर कपूर यांनी केला आहे. ‘डेली पोस्ट’शी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं की, “चित्रपटाचा एक सीन शूट करायचा होता. ज्यामध्ये श्रीदेवी झुरळाला घाबरून खोलीतून पळत आहे आणि झुरळ तिचा पाठलाग करतो. तेव्हा मी आणि सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी हे झुरळ अभिनय कसा करतील या चिंतेत होतो.”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आम्ही झुरळांना नशेत ठेवण्याची कल्पना सुचली. आम्ही झुरळासमोर थोडी ओल्ड मोंक रम ओतली. आम्हाला वाटले की दारु पिऊन त्याने काही गोष्टी करायला सुरुवात केली असावी. पण मी खरं सांगतो की त्याच्याकडे बघून तो खरंच दारुच्या नशेत असल्यासारखा वाटत होता. यानंतर आम्ही आमच्या सोयीनुसार तो सीन अगदी आरामात शूट केला”.
दरम्यान, लवकरच या चित्रपटाचा दूसरा भाग प्रेक्षकांच्या भेटला येणार असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप याबबात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण या चित्रपटाचे अनेक चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र श्रीदेवी, अमरीश पुरी व सतीश कौशिक या मुख्य कलाकारांचे निधन झाले आहे, त्यामुळे आता नवीन भागात कोणते कलाकार असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.