शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘तू दूर का…’, ओंकार भोजनेची कविता ऐकून उपस्थित कलाकार मंडळीही भारावली, जोरदार प्रतिसाद अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 4, 2024 | 4:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajtra fame onkar bhojne tu dur ka poetry video viral on social media

Video : 'तू दूर का…', ओंकार भोजनेची कविता ऐकून उपस्थित कलाकार मंडळीही भारावली, जोरदार प्रतिसाद अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून ‘कोकण कोहिनूर’ म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. आपल्या विनोदाच्या अनोख्या बाजाने ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये अनेक पात्रांमध्ये विनोदाचे नवे रंग भरले. त्याने साकरलेली अनेक पात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहण्यासारखी आहेत. विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणारा हा कलाकार उत्तम कवितादेखील सादर करतो.

टीव्हीचा छोटा पडदा असो, रंगभूमी असो, वा चित्रपटाची 70 mm स्क्रीन असो ओंकारने त्याच्या अभिनयाने मनोरंजनाच्या या तीनही क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. ओंकारच्या अभिनयाचे तर लाखों चाहते आहेतच पण त्याच्या कवितांचादेखील एक वेगळाच चाहतावर्ग आहे. ओंकारने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये ‘तू दूर का?’ ही कविता सादर केली होती. त्यावेळी त्याच्या कवितेला परीक्षकांसह चाहत्यांनीदेखील चांगलेच डोक्यावर घेतले होते. अशातच आता पुन्हा एकदा ओंकारने ही कविता सादर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटकक्षेत्रात मोठं पाऊल, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “वडिलांना अभिमान वाटेल असं…”

नुकत्याच पार पडलेल्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ या पुरस्कार सोहळ्यात ओंकारने त्याची ‘तू दूर का?’ ही कविता सादर केली आणि उपस्थितांसह साऱ्यांनाच गहिवरुन आले. ओंकार भोजने सध्या महेश मांजरेकर निर्मित ‘करून गेलो गाव’ या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. याच नाटकातील काही भाग ओंकार व भाऊं कदम यांनी झी नाट्य गौरव’मध्ये सादर केला. तेव्हा ओंकारने ‘तू दूर का?, मी असा मजबूर का?’ ही कविता सादर केली.

आणखी वाचा – “दुसऱ्यांचा बंद केलेला शो आणण्यापेक्षा…”, निलेश साबळेच्या नव्या शोवरुन प्रेक्षकांना आठवलं ‘चला हवा येऊ द्या’, म्हणाले, “त्यापेक्षा ‘बिग बॉस’…”

झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या कवितेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, ओंकार भोजने लवकरच डॉ. निलेश साबळे व भाऊ कद यांच्याबरोबर हसताय ना? हसायलाच पाहिजे या शोद्वारे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याचया या नवीन् शोविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.   

Tags: marathi entertainment newsonkar bhojaneTu Dur Ka Kavita
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
kangana ranaut on hema malini

कॉँग्रेस नेत्याची हेमा मालिनी यांच्यावर घाणेरड्या शब्दांत टीका, कंगना रणौत भडकली, म्हणाली, “महिलांनी कसं राहायचं हे…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.