बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौत ही गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आली आहे. २० वर्षे बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर आता तिने मोर्चा राजकारणकडे वळवला आहे. आता हिमाचल प्रदेशमधील मंडी या भागातून तिला तिकीट मिळालं आहे. तिने राजकारणात प्रवेश केल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. काही जणांनी तिच्या राजकारणातील प्रवेशावर टीका केली आहे तर काहींनी तिचे स्वागत केले आहे. ती प्रवेशानंतर लगेचच सक्रिय झालेली देखील दिसत आहे. नुकतेच तिने भाजप पक्षातील ज्येष्ठ नेत्या व ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांची बाजू घेत लक्षवेधी भाष्य केले आहे. (kangana ranaut on hema malini )
नुकतेच तिने ‘आजतक’बरोबर संवाद साधताना तिने अनेक प्रकरणांवर खुलेपणाने भाष्य केले आहे. हेमा मालिनी यांच्यावर कॉँग्रेसमधील एका नेत्याने टीका केली होती. त्यावर आता कंगनाने त्या नेत्याला खडे बोल सुनावले आहेत. ती म्हणाली की, “याला तुम्ही अजून कोणत्या नजरेने पाहणार आहात?जर ती एखादी तरुणी असेल तर तिच्या शरीरावर प्रतिक्रिया द्याल. ज्या स्त्रीबद्दल बोलत आहात त्या ७५ वर्षांच्या आहेत तसेच शास्त्रीय नृत्य करणाऱ्या नृत्यांगणा आहेत. त्यांना तुम्ही जर नाचणारी किंवा इतर अपशब्द वापरत आहात. एखाद्या वयस्कर व्यक्तीला देखील ते सोडत नाही. महिलांनी नक्की कसं राहावं हे त्यांनी का ठरवावं. त्यांनी स्वतःसाठी खड्डा खोदला तरच ते चांगले असेल”.
तसेच ती पुढे म्हणाली की, “इतकी खालच्या दर्जाचे विचार, जी खासकरुन एखादी कलाकार असेल जीने स्वतःचे आयुष्य कलेला वाहिले असेल त्यांच्यासाठी कसे मांडू शकता. त्यांनी जवळपास ३ ते ४ तास सराव केला असेल आपल्या वेदांमध्ये सामवेद आहे. ज्यामध्ये संगीत व नृत्यावरवर विशेष असे काही लिहून ठेवले आहे. पण चुकीच्या प्रतिक्रिया देणाऱ्यांना ते समजणार नाही”.
त्यानंतर तिला “राजकारण कठीण आहे की अभिनय?” असे विचारले. त्यावर ती म्हणाली की, “मला या क्षेत्रात येऊन २० वर्ष झाली त्यामुळे अनुभव असल्याने मला हे सोपं वाटतं. तसेच मी कुठे भाषण करण्यास गेले तर मी कधीही भाषण तयार करुन जात नाही. तेथील लोक बघून , वातावरण बघून मी लोकांशी संवाद साधते.