रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारंपरिक पंजाबी सूट, हातात लाल चुडा, काळा चष्मा आणि…; तापसी पन्नूचा लग्नातील व्हिडीओ समोर, नाचत मंडपात एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 3, 2024 | 5:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tapsee pannu wedding video

पारंपरिक पंजाबी सूट, हातात लाल चुडा, काळा चष्मा आणि...; तापसी पन्नूचा लग्नातील व्हिडीओ समोर, नाचत मंडपात एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तापसी पन्नू हीने बॉलिवूडमध्ये आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्त्व निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी तिने बॉयफ्रेंड मॅथियस बरोबर लग्न केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र तिच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ आतापर्यंत सर्वांच्या समोर आले नव्हते. पण आता त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तापसी खूप धमाल करताना दिसत आहे. (taapsee pannu wedding video)

उदयपूर तापसी व मॅथियस यांनी अगदी शाही थाटात लग्न केले. या व्हिडीओमध्ये तापसी एका पारंपारिक पंजाबी ड्रेसमध्ये दिसून येत आहे. तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून लाल रंगाचा चुडा, काळा चष्मा अशा खास अंदाजात तिने एंट्री घेतली. तसेच ‘इथ्थे प्यार कि पुछ होई ना, तेरे नाल नय्यो बोलना, तेरे मुह ते मुछ कोई ना’ या पंजाबी गाण्यावर तिने डान्स करत एंट्री केली.

आणखी वाचा – १२ बेडरुन, स्विमिंग पूल आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केलं ईशा अंबानीचं प्रशस्त घर, किंमत आहे तब्बल…

View this post on Instagram

A post shared by India Forums (@indiaforums)

स्टेजकडे येत असताना तापसिने मॅथियसचा हात पकडला होता. मॅथियसने देखील शेरवानी परिधान केली होती. तसेच पगडीदेखील परिधान केली होती. लग्नस्थळी येताच दोघांनी एकमेकांना मिठी मारली होती. दोघांनीही पंजाबी गाण्यावर डान्स केला. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ची वेळ का बदलली?, दुपारी मालिका प्रसारित होण्यावरुन मिलिंद गवळींचं वक्तव्य, म्हणाले, “दुपारच्या वेळी टीआरपी…”

दरम्यान तापसीने लग्नाबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती. टीम इंडियाचा बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक असलेला प्रियकर मॅथियास बोबरोबर मागील १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती आणि अखेर त्यांनी लग्न केले. तापसीने तिच्या प्रियकराबरोबरचे नाते कधीच लपवले नाही. ती प्रत्येकवेळी त्याच्याबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत असते. तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू व तमिळ चित्रपटसृष्टीतीलही प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने मॉडेलिंगपासून तिच्या अभिनयाची सुरुवात केली होती. तापसीने ‘जुडवा २’, ‘बदला’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ व ‘शाबाश मिठू’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तापसीच्या लग्नाच्या व्हिडीओला सर्वांची खूप पसंती मिळत आहे.

Tags: mathiyas bowtapsee pannuweddingwedding video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi director said that many popular Marathi actresses were chosen instead for the role of Rupali

ऐश्वर्या नारकर नव्हे तर 'सातव्या मुलीची…'मध्ये रुपालीच्या भूमिकेसाठी अलका कुबल यांना घ्यायचं होतं पण…; दिग्दर्शक म्हणाले, "असा चेहरा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.