शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : रमजानमध्ये शिव ठाकरेने मुस्लिम बांधवांना दिलं अन्नधान्य, मराठमोळ्या अभिनेत्याचं सर्वत्र कौतुक, नेटकरी म्हणाले, “मराठी कलाकाराचं…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 1, 2024 | 3:49 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Shiv Thakare seen distributing Ration Kit to the needy on the occassion of Ramadan

Video : रमजानमध्ये शिव ठाकरेने मुस्लिम बांधवांना दिलं अन्नधान्य, मराठमोळ्या अभिनेत्याचं सर्वत्र कौतुक, नेटकरी म्हणाले, "मराठी कलाकाराचं..."

मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात ‘आपला माणूस’ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा कलाकार म्हणजे शिव ठाकरे. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे व निरागस हास्याने शिवने अनेकांची मनं जिंकली आहेत. आपल्या डान्स व दिलखुलास स्वभावामुळे चर्चेत राहणारा शिव सोशल मीडियाद्वारेदेखील कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच सोशल मीडियावर सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  

सध्या रमजाननिमित्त ठिकठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असून नुकतीच शिवनेदेखील एका इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी मुस्लिम बांधवांकडून अभिनेत्याचा सन्मान करण्यात आला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याने केलेल्या कृतीमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. शिवने रमजाननिमित्त गरिबांना अन्नदान केले आणि त्याच्या याच समाजभान जपणाऱ्या कृतीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – गोविंदाच्या भाचीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, आरती सिंहचं सजलं घर, फोटो शेअर करत म्हणाली, “नवी सुरुवात…”

रमजान पर्वात बहुसंख्य मुस्लीम बांधव उपवास (रोजे) करतात. त्यामुळे रमजानच्या पर्वात अनेक कुटुंबीय प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या गरिबांना मदत करतात. सायंकाळी उपवास सोडण्याच्या वेळेस अन्नदान म्हणून विविध पदार्थांचे वाटप करणे हे पवित्र मानले जाते. त्यामुळे अनेक मुस्लिम बांधव अन्नदान म्हणून पदार्थांचे वाटप करत असतात. शिवनेदेखील रमजानच्या पर्वात गरिबांना अन्नदान केल्याने तो सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.

आणखी वाचा – ‘सातव्या मुलीची…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं डोंबिवलीमध्ये आहे गिफ्टचं दुकान, अजूनही आई-बाबा करतात व्यवसाय, म्हणाली, “आमच्या दुकानात…”

‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजने शिवचा हा अन्नदान करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडीओखाली शिवच्या अनेक चाहत्यांनी त्याचे या कृतीबद्दल कौतुक केले आहे. “खूप छान काम, शिव कायमच समाजकार्यासाठी योगदान देतो, समाजभान जपणारा माझा आवडता अभिनेता, याच कृतीमुळे शिव हा इतर कलाकारांपेक्षा वेगळा आहे, कायम असेच समाजकार्य करत रहा” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या व्हिडीओला चांगलीच पसंती दर्शवली आहे.   

Tags: marathi actormarathi entertainment newsshiv thakare
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shweta Mehendale talked about the reactions she received from her son for her role

"आई तुझ्याकडेही दैवी शक्ती आहे का?", 'सातव्या मुलीची…'मधील इंद्राणीला तिच्याच लेकाने विचारला प्रश्न, म्हणाली, "तो सेटवर आला तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.