बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींमध्ये श्रीदेवीचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर अनेक तर्क-वितर्क मांडले गेले. त्यांचे पती बोनी कपूर हे नेहमी श्रीदेवी यांच्याबद्दल उल्लेख करत असतात. त्यांच्या सर्व आठवणी त्यांनी अनेक कार्यक्रमादरम्याने सांगितल्या आहेत. अशातच त्यांनी पुन्हा एकदा श्रीदेवींच्या अध्यात्मक बाजुबद्दल खुलासा केला आहे. श्रीदेवी या सुरवातीपासूनच धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी घरातील सर्वांनाच आध्यात्माचे महत्त्व पटवून दिले होते. (boney kapoor on shridevi)
बोनी सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘मैदान’च्या प्रमोशनामध्ये व्यस्त आहेत. यावेळी त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रीदेवी यांच्या अध्यात्मिकतेबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. श्रीदेवी या आधीपासूनच खूप धार्मिक होत्या आणि त्यामुळे बोनीदेखील खूप धार्मिक झाले. त्यांच्यामुळे बोनी यांचीदेखील देवांवरील श्रद्धा वाढली. त्यानंतर दोघांचे नाते खूपच घट्ट झाले.
याबरोबरच श्रीदेवी यांनी काही असामान्य गोष्टीही केल्या आहे. हे सांगताना ते म्हणाले की, “जेव्हा श्रीदेवीच्या आईचं निधन झालं होतं तेव्हा स्वतः श्रीदेवी यांनी मुखाग्नी दिला होता”. अनेक संस्कृतींमध्ये सहसा पुरुषांनी चितेला मुखाग्नी देण्याची प्रथा आहे. पण हे श्रीदेवी यांनी केले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीदेवी यांचे तिरुपति बालाजी मंदिराचे खास नातं आहे. त्या ठिकाणी मोठी मुलगी जान्हवी कपूर देखील नेहमी दर्शनासाठी जात असते. नुकताच जान्हवीचा वाढदिवस झालं तेव्हाही ती मंदिरात पोहोचली होती. ही तिची मंदिरात दर्शन घेण्याची ५० वी वेळ होती.
दरम्यान श्रीदेवी यांच्या मृत्यूने एक गूढ निर्माण झाले होते. २०१८ साली श्रीदेवी कुटुंबासहित एका लग्नाला हजेरी लावली होती. ज्या हॉटेलमध्ये त्या राहिल्या होत्या तेव्हा तेथील बाथरूममधील बाथटबमध्ये बुडाल्याने त्यांचे निधन झाले. यावर बोनी यांनी एक खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, “चांगले दिसण्यासाठी ती लो-सॉल्ट डाएटवर होती. त्यामुळे अनेकदा चक्करही येत होती. मृत्यूच्या कालावधी मध्येही ती याच डाएटवरवर होती”.
तसेच त्यांनी सांगितले होते की, “ती नेहमी उपाशी राहायची. स्क्रीनवर छान दिसावे म्हणून ती सतत प्रयत्न करायची. जेव्हा तिने माझ्याशी लग्न केले तेव्हा अनेकदा तिला चक्कर देखील आली तेव्हा डॉक्टरांनी रक्तदाबाचा त्रास असल्याचे सांगितले होते”.
दरम्यान श्रीदेवी यांच्याबद्दल बोलताना बोनी नेहमी भावनिक होताना दिसतात. सर्व कार्यक्रमांमध्ये ते श्रीदेवी यांची आठवण काढताना दिसतात.