रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कार्तिकी गायकवाडने गरोदरपणामध्ये पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, डोहाळे जेवणाच्या संपूर्ण कार्यक्रमाचीही दाखवली झलक, म्हणाली, “खास क्षण…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 29, 2024 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Saregamapa little champs fame kartiki gaikwad shared photos with the good news that she is going to be a mother

कार्तिकी गायकवाडने गरोदरपणामध्ये पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, डोहाळे जेवणाच्या संपूर्ण कार्यक्रमाचीही दाखवली झलक, म्हणाली, "खास क्षण..."

झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोची व या शोमधील गायकांची आजही चर्चा होताना दिसून येते. या शोमधील छोट्या गायकांनी आपल्या आवाजाने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या शोची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड ही तिच्या आवाजाने कायमच चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते. अशातच कार्तिकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कार्तिकी गायकवाड ही लवकरच आई होणार असून नुकताच तिच्या डोहाळ जेवणाचा जंगी कार्यक्रम पार पडला. पारंपरिक पद्धतीनं कार्तिकीचं डोहाळ जेवण करण्यात आले. या डोहाळे जेवणाचे काही खास फोटो तिने नुकतेच तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कार्तिकीचे आई-वडील, सासू-सासरे व तिचे दोन भाऊ दिसत आहेत. आपल्या कुटुंबियांबरोबर आनंदाने तिने हा खास कार्यक्रम पार पाडला. “ओटीभरण कार्यक्रमातील काही खास क्षण” असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad – Pise (@kartiki_kalyanji_gaikwad9)

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडचा नवरा आहे मोठा उद्योजक, तो नेमकं काय काम करतो?, रोनितला करण्यात आलं होतं सन्मानित कारण…

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकीचा मोठा चाहतावर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मधील कार्तिकीचं ‘घागर घेऊन’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. कार्तिकी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अशातच तिने शेअर केलेले हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad – Pise (@kartiki_kalyanji_gaikwad9)

आणखी वाचा – Video : लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी गायकवाड आई होणार, थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, नवऱ्यासह धमाकेदार एन्ट्री अन्…; व्हिडीओ व्हायरल

डोहाळ जेवणासाठी कार्तिकीने या खास कार्यक्रमासाठी हिरव्या रंगाची जरीची सुंदर साडी नेसली होती. तर तिचा नवरा रोहित पिसे हा पठाणी शेरवानीमध्ये दिसला. कार्तिकीने या खास सोहळ्यासाठी खास पारंपरिक दागिने परिधान केले होते. आई होणार असल्याच्या खुशखबरमुळे कार्तिकीच्या चेहऱ्यावरील सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे. दरम्यान, कार्तिकी आई होणार असल्याची खुशखबर समोर येताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  

Tags: kartiki gaikwadmarathi entertainment newsmarathi singer
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Amol Kolhe shared a post requesting Eknath Shinde After Govinda joined ShivSena

“मला नट म्हणून हिणवतात आणि…”, गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश होताच अमोल कोल्हेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले, “आपल्या सहकाऱ्यांना…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.