रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आशुतोषचा मृत्यू मराठी कलाकारांनाही बघवेना, सुप्रसिद्ध अभिनेता कमेंट करत म्हणाला, “अरुंधतीला त्याच्याशिवाय पाहणं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 27, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
abhijeet kelkar on aai kuthe kay karte

'आई कुठे काय करते' मालिकेतील आशुतोषचा मृत्यू मराठी कलाकारांनाही बघवेना, सुप्रसिद्ध अभिनेता कमेंट करत म्हणाला, "अरुंधतीला त्याच्याशिवाय पाहणं…"

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या नव्या रंजक वळणाने संपूर्ण प्रेक्षकवर्ग हादरला आहे. गेली सव्वाचार वर्षे ही मालिका अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेच्या कथानकात आलेल्या चढाव-उतारांमुळे ही मालिका बरेचदा ट्रोलही झालेली पाहायला मिळाली. असं असलं तरी या मालिकेचा प्रेक्षकवर्ग हा खूप मोठा आहे. मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेमही करताना दिसतात. दरम्यान मालिकेतल्या कलाकारांवरही प्रेक्षक प्रेम करतात. अशातच मालिकेतील एका लोकप्रिय पात्राने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने सध्या प्रेक्षक नाराज आहेत. (abhijeet kelkar on aai kuthe kay karte)

मालिकेत आता आशुतोष केळकर म्हणजेच ओंकार गोवर्धनचा मृत्यू झाला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आशुतोषचा अपघातात मृत्यू झाला असून त्यामुळे अरुंधतीवर खूप मोठं संकट ओढवलं आहे. अरुंधती आशुतोषच्या जाण्यातून सावरलेली नाही. तर एकीकडे आशुतोषची आई सुलेखा ताईदेखील लेकाच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरतात. मालिकेतील हा सीन पाहून सगळेच प्रेक्षक आशुतोषला मिस करत आहेत. इतकंच नव्हेतर कलाकार मंडळींनाही आशुतोषच्या जाण्याने दुःख झालं आहे.

आणखी वाचा – “प्रत्येकाची दोन दोन लफडी आणि…”, आशुतोषच्या जाण्याने खचली अरुंधती, पोस्ट शेअर केल्यानंतर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “मालिका बघणारेही…”

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

आशुतोषच्या जाण्याने केवळ मालिकेतील कलाकारांनाच नाहीतर मालिकेशिवाय इतरही कलाकारांना दुःख झालं आहे. आशुतोषच्या मालिकेतील एक्झिटनंतर मिलिंद गवळी, मधुराणी प्रभुलकर यांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी आशुतोष म्हणजेच ओंकार गोवर्धनच्या स्वभावाचं कौतुक करत त्याला मिस करत असल्याचं म्हटलं. आशुतोषची पत्नी अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिने देखील ओंकारला मिस करत असल्याची खास पोस्ट शेअर केली.

आणखी वाचा – “तब्येतीवर परिणाम झाला आणि…”, आशुतोषच्या मृत्यूमुळे मधुराणी दुःखात, अभिनेत्रीच्या पोस्टला ओंकारचं उत्तर, म्हणाला, “तुझी आठवण…”

अरुंधतीच्या या पोस्टवर अभिजीत केळकरनेही कमेंट करत म्हटलं की, “मी स्वतः एक अभिनेता असूनही मला आशुतोषचं जाणं सहन होत नाही किंवा स्वीकार करता येणार नाही. त्याही पलीकडे जाऊन, यापुढे तुला त्याच्याशिवाय तसं पाहणं जमणार नाही. हे तुमच्यावरचं प्रेम म्हणा वा सवय किंवा आणखीन काही”. तर खुशबू तावडेनेही हार्ट ईमोजी शेअर करत भावना व्यक्त केल्या.

Tags: aai kuthe kay karteaai kuthe kay karte castabhijeet kelkar on aai kuthe kay kartemarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ranbir Kapoor and Alia Bhatt New Home

आलिया भट्ट व रणबीर कपूर नव्या बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव, घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.