एखाद्या सणाप्रमाणे प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट बघतात ती गोष्ट म्हणजे क्रिकेट जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली क्रिकेटलीग आयपीएल. प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी आयपीएल म्हणजे पर्वणीच. आयपीएल मधील सर्वाधिक चाहतावर्ग असलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. आयपीएलचा किताब तब्बल ५ वेळा जिंकण्याचा विक्रम देखील मुंबइ इंडियन्स या संघाच्या नावावर आहे आणि या विक्रमाचा मुख्य सूत्रधार म्हणजे माजी कर्णधार रोहित शर्मा. यंदाच्या आयपीएलमध्ये लीग सुरू होण्यापूर्वीच रोहित शर्मा चर्चेत आला तो म्हणजे अचानक सोडलेल्या कर्णधार पदामुळे. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाला रोहितच्या चाहत्यांकडून प्रचंड विरोध करण्यात येतोय. (Kieron Pollard about Rohit Hardik rift)
आयपीएलमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करुन रोहितने त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला. यंदाच्या आयपीएल हंगामात मात्र अचानक हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. रोहितच्या चाहत्यांचा राग अनावर होऊन हार्दिक पांड्यावर सर्वत्र टीका केली जाऊ लागली. दरम्यान मुंबई आणि गुजरात दरम्यान झालेल्या सामन्यात देखील रोहितच्या नावाच्या घोषणा देत चाहत्यांनी दंगा केल्याचं पाहायला मिळालं.

आणखी वाचा- Video : “अरे छपरी”, लाईव्ह मॅचमध्येच हार्दिक पांड्याचा चाहत्यांकडून अपमान, जोरजोरात ओरडू लागले अन्…; पत्नीलाही बघवेना, व्हिडीओ व्हायरल
आता मात्र हार्दिकच्या समर्थनार्थ मुंबई इंडियन्सच्या संघाचे बॅटिंग कोच सरसावले आहेत. एकेकाळी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये असणारा वेस्ट इंडिजचा विस्फोटक बॅट्समन किरोन पोलार्ड आता या संघाचा बॅटिंग कोच म्हणून कार्यरत आहे. कर्णधार हार्दिक पांड्या बाबत होणाऱ्या टिकेसंदर्भात पोलार्ड म्हणाला,”हार्दिकला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय हा पूर्ण टीमचा होता. आम्ही जे काही करतो ते टीममधील सर्व खेळाडूंच्या संमतीने करतो. सुरुवातीला टीमची धुरा 4 उत्तम फलंदाजांच्या हाती असून हार्दिक आणि डेव्हिड हे उत्तम फिनिषयर म्हणून ओळखले जातात. रोहित शर्माच्या हाताखाली हार्दिक आणि ही संपूर्ण टीम तयार झाली आहे त्यामुळे त्याच्या तिथे असण्याचा सगळ्यांना फायदा आहे.”(Kieron Pollard about Rohit Hardik rift)
पुढे पोलार्ड म्हणाला,” पहिली ओव्हर हार्दिकने स्वतः टाकण्याचा घेतलेला निर्णय हा देखील एक स्ट्रेटजीचा भाग आहे. त्याने यापूर्वी गुजरात टीममध्ये असताना देखील पहिली ओव्हर टाकत नवीन चेंडूने अनेक गाडी बाद देखील केले आहे.” पोलार्डच्या विधानाबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त जाहीर केले आहे.