शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तापसी पन्नू अडकली विवाहबंधनात, बॉयफ्रेंड मॅथियस बोबरोबर उदयपुरमध्ये बांधली लग्नगाठ, जवळच्या मित्राने शेअर केले खास फोटो

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 25, 2024 | 2:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Taapsee pannu married with boyfriend mathias boe see the details

तापसी पन्नू अडकली विवाहबंधनात, बॉयफ्रेंड मॅथियस बोबरोबर उदयपुरमध्ये बांधली लग्नगाठ, जवळच्या मित्राने शेअर केले खास फोटो

गेल्या काही महिन्यांत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. रकुल प्रित सिंह व जॅकी भगनानी यांच्या लग्नानंतर आता आणखी एका अभिनेत्रीचे लग्न पार पडले आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. तापसीने उदयपूरमध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. जवळचे नातेवाईक आणि काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये २३ मार्च रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला असल्याचे वृत्त आहे.

टीम इंडियाचा बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक असलेला प्रियकर मॅथियास बो बरोबर तिचा विवाह पर पडला आहे. तापसी ही प्रियकर मॅथियासबरोबर मागील १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती आणि अखेर त्यांनी लग्न केले आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तापसीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची सुरुवात २० मार्चपासून झाली होती आणि २३ मार्च रोजी हा हा विवाहसोहळा पार पडला.

View this post on Instagram

A post shared by Pavail Gulati (@pavailgulati)

आणखी वाचा – निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘राम’ची राजकारणात एण्ट्री, ‘रामायण’ फेम अरुण गोविल लढवणार आगामी लोकसभा निवडणूक, भाजपकडून तिकीट जाहीर

तापसी पन्नूच्या लग्नाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींना आमंत्रित केलं नव्हतं. अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील फक्त तिच्या जवळच्या मित्रांना, अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों यांनी आमंत्रित केले होते. अनुराग कश्यप आणि तापसी यांच्या ओळखीबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमांसाठी दोघे एकत्र आले होते. दिग्गज दिग्दर्शकाने अभिनेत्रीच्या ‘मनमर्जियां’ आणि ‘दोबारा’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या चर्चांदरम्यान कंगणा रणौतची राजकारणात एण्ट्री, भाजपकडून अभिनेत्रीला उमेदवारी जाहीर, ‘या’ मतदार संघातून लढवणार निवडणूक

दरम्यान, तापसीने तिच्या प्रियकराबरोबरचे नाते कधीच लपवले नाही. ती प्रत्येकवेळी त्याच्याबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत असते. तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू व तमिळ चित्रपटसृष्टीतीलही प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने मॉडेलिंगपासून तिच्या अभिनयाची सुरुवात केली होती. तापसीने ‘जुडवा २’, ‘बदला’, ‘नाम शबाना’, ‘पिंक’ व ‘शाबाश मिठू’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Tags: Bollywood entertainment newsTaapsee Pannu Mathias boe Marriage
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Titeeksha Tawde and Siddharth Bodke shared a special video on the occasion of holi

एकमेकांच्या प्रेमात रंगले सिद्धार्थ-तितीक्षा, लग्नानंतर साजरी केली पहिली धूळवड, अभिनेत्री खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "माझ्या आयुष्यात रंग..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.