शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सातारा जिल्हा नकाशावर आणण्यात माझं योगदान…”, अभिजीत बिचुकलेंनी ‘डॉक्टरेट’ पदवी मिळताच व्यक्त केली भावना, म्हणाले, “माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 24, 2024 | 12:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss fame Abhijeet Bichukale expressed his happiness on this occasion of he awarded with doctorate degree

“सातारा जिल्हा नकाशावर आणण्यात माझं योगदान...”, अभिजीत बिचुकलेंनी ‘डॉक्टरेट’ पदवी मिळताच व्यक्त केली भावना, म्हणाले, “माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण...”

‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे प्रसिद्धीस आलेले कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. अभिजित बिचुकले बिग बॉस सीझन १५ चे स्पर्धक आहेत. त्यांनी वाईल्ड कार्डद्वारे शोमध्ये प्रवेश केला होता. शोच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्या स्वभावामुळे ते चर्चेत होते. अशातच आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि या चर्चेचं कारण म्हणजे त्यांना नुकतीच मिळालेली डॉक्टरेट पदवी.

अभिजीत बिचुकले यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. ही डॉक्टरेट पदवी त्यांना कोणी आणि कशासाठी दिली? याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. मॅजिक आणि आर्ट यूनिवर्सिटीकडून अभिजीत बिचुकले यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. कला व मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ही डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. याबाबत बिचुकले यांनी ‘साम टीव्ही’शी संवाद साधला आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यावेळी बिचुकले यांनी असं म्हटलं की, “माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. लोक, विद्यापीठ माझी दखल घ्यायला लागले आहेत आणि हे सर्व माझ्या कर्मामुळे होत आहे. माझं कर्म चांगलं आहे. २३ मे १९९६ रोजी म्हणजे सरासरी २८ वर्षांपूर्वी मी क्षितिज नावाचा एक बालकविता संग्रह प्रकाशित केला. तेव्हा मी अवघ्या २० वर्षांचा होतो, तिथून माझा प्रवास सुरू झाला. तुमच्यासारख्या माध्यमांना माझा प्रवास माहितीच आहे. मराठी बिग बॉस असेल, हिंदी बिग बॉस असेल, मी तिथे जाऊन ठसा उमटवला”.

View this post on Instagram

A post shared by Abhijit Bichukale (@abhijitbichukale)

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “यामुळे मी सातारा या संपूर्ण जिल्ह्याची ओळख बनलो. सातारा जिल्हा हा महाराष्ट्र व जगाच्या नकाशावर घेऊन जाण्यामध्ये माझं योगदान आहे. त्यामुळे या यूनिवर्सिटीने माझ्याशी संपर्क साधला. ते विविध राज्यातल्या नामांकित लोकांना शोधत होते. त्यांनी माझं नाव नॉमिनेट करून मला ही डॉक्टरेट दिली आहे. आता इथूनपुढे आपण डॉक्टर अभिजीत वामनराव आव्हाडे-बिचुकले असं लावू शकतो.” 

आणखी वाचा – “एक माणूस समोरून आला अन्…”, प्रिया बापटने सांगितला तिच्याबरोबर घडलेला ‘तो’ धक्कादायक प्रकार, म्हणाली, “तेव्हापासून माझ्या मनात…”  

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “या यूनिवर्सिटीचे प्रमुख ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये आले होते. ते जादूगार आहेत आणि ते विद्यापीठाचे प्रमुखही आहेत. ते मला म्हणाले, तुम्ही गाता, तुम्ही कविता करता, महाराष्ट्रात राहता आणि मराठीत तुमचं नाव खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला डॉक्टरेट देत आहोत. तुम्ही स्वीकार करालं का? असं विचारलं. त्यामुळे मी ही डॉक्टरेट पदवी स्वीकारली.”

आणखी वाचा – “निसर्गसौंदर्याशी तडजोड करुन…”, केतकी माटेगांवकरची ‘ती पोस्ट चर्चेत, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विनंती करत म्हणाली, “यावर आपण मिळून… ”  

दरम्यान, बिचुकले हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात ते नक्की कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत? हेदेखील जाहीर करणार आहेत.

Tags: abhijeet bichukaleBigg Boss Famemarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sukanya Mone shared a special video of making Puranpoli on her social media

होळीनिमित्त सुकन्या मोनेंनी केला पुरणपोळ्यांचा खास बेत, झटपट पदार्थ करतानाचा व्हिडीओही केला शेअर, म्हणाल्या, “घरच्या मंडळींना सणाला...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.