शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनुष्का-विराटचं फ्लाइंग किस ते बॉलिवूड कलाकारांचा दंगा, IPLमध्ये बॉलिवूडकर जेव्हा भाव खाऊन गेले तेव्हा…; काही खास क्षण

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 23, 2024 | 4:18 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
IPL Match moments

अनुष्का-विराटचं फ्लाइंग किस ते बॉलिवूड कलाकारांचा दंगा, IPLमध्ये बॉलिवूडकर जेव्हा भाव खाऊन गेले तेव्हा...; काही खास क्षण

देशभरात सध्या आयपीएलचे वारे वाहत आहेत. २००८ साली सुरु झालेल्या आयपीएलचा आता नवा सीजन २२ मार्च ते २६ मे दरम्यान होणाऱ्या मॅचमध्ये या वेळी कोणता संघ बाजी मारणार हे पाहाण्यासारखं आहे. क्रिकेटचा व भारताचा जुना संबंध आहे. आयपीएलच्या निमित्ताने आता बॉलिवूडदेखील एकत्रित आल्याचे पाहायला मिळत आहे. २००८ पासून सुरु झालेल्या आयपीएलच्या दरम्यानचे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतात. अभिनेता शाहरुख खानचा वानखेडे स्टेडियममध्ये झालेला प्रकार आजही क्रिकेटरसिकांच्या लक्षात आहे. असेच काही किस्से आहेत ते आपण जाणून घेऊया. (IPL Match moments)

अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या अभिनयामुळे अधिक चर्चेत असतो. त्याचप्रमाणे तो आयपीएल पहिल्या सीजनपासूनच केकेआर संघाचा सहमालक आहे. तो अनेकदा संपूर्ण कुटुंबासह मॅचचा आनंद घेताना दिसला आहे.त्याचप्रमाणे त्याने एकदा मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सुरक्षारक्षकाबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याला काही वर्षांसाठी या स्टेडियमवर येण्यासाठी बंदी घातली होती.

आणखी वाचा – सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा अथर्व सुदामे महिन्याला नक्की किती कमावतो?, म्हणाला, “लग्नानंतर जबाबदारी असतानाही फुल टाइम…”

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

त्यानंतर भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा आरसीबी संघातून खेळत असतो. त्याच्या प्रत्येक मॅचच्या वेळी त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमी त्याला चीयर करताना दिसते. तो भारताच्या बाजूने खेळत असला किंवा आयपीएलमध्ये खेळत असला तरीही अनुष्का नेहमी त्याला प्रोत्साहन देताना दिसते.

आणखी वाचा – “संतपच नाही गं तुझं नाव घेणं…”, लेकाची विशाखा सुभेदारांसाठी खास पोस्ट, आईवर आहे जीवापाड प्रेम, म्हणाला, “कधीच हट्ट नाही की…”

अभिनेत्री प्रीती झिंटा ही पंजाब किंग्सची सहमालक आहे. ती नेहमी आपल्या टीमला जोशभरात प्रोत्साहन देताना दिसते. २०१७ साली प्रीती व अभिषेक बच्चन यांना एकत्रितपणे मॅच बघताना पाहिले गेले आहे. ते अनेकदा सेल्फी घेताना दिसतात तसेच एकमेकांची मस्करी करतानादेखील दिसतात. मजेशीर गोष्ट म्हणजे दोघेही वेगवेगळ्या संघांना प्रोत्साहन देत असतात.

क्रिकेट विश्वात कधीही काहीही होऊ शकते याचा प्रत्यय अनेक मॅचच्या दरम्याने येत असतो. त्यातील एक प्रकार म्हणजे २०१८ साली सुपरस्टार सलमान खान व अनिल कपूर या दोघांनीही चेन्नई सुपर किंग्स व सनराइजर्स हैद्राबादमध्ये झालेल्या मॅचची कॉमेंट्री केली होती. त्यांची कॉमेंट्रीला प्रेक्षकांना खूप प्रतिसाद दिला होता.    

Tags: cricket matchiplipl new seasonmomentsold match moments
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Madhuri Dixit Husband

Video : नवरा असावा तर असा! माधुरी दीक्षितच्या पतीने स्वतः बनवली पुरणपोळी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.