आपल्या अनोख्या शैलीने तसेच आसपासच्या घटनांवर व परिस्थितीवर मार्मिकपणे भाष्य करण्याचे कौशल्य दाखवत आणि तरुणाईसह सर्व वयोगटांतील लोकांचे मनोरंजन करण्याच्या कसबीने कंटेन्ट क्रिएटर अर्थव सुदामे घराघरांत पोहोचला. विनोदी विषय, सामाजिक संदेश देणारे विषय आणि आशयघन रिल्समधून तो लोकांचं मनोरंजन करत असतो. त्याला न ओळखणाऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असेल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय पुणेकर अशी ओळख निर्माण करणारा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. (Atharva Sudame Income)
२०१५ सालापासून अर्थवने व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. अथर्वचे इन्स्टाग्रामवर १.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. हल्ली अनेक मराठी सेलिब्रिटी आपल्या चित्रपटांच्या डिजीटल प्रमोशनसाठी अथर्वबरोबर त्याच्या रिलमध्ये दिसून येतात. सुरुवातीला फारसा प्रतिसाद नसणाऱ्या अथर्वच्या व्हिडीओला त्यांच्या कंटेन्टने खरी ओळख मिळवून दिली. कंटेन्ट तयार करणे ही अर्थवची खासियत असली तरी त्याने अभिनयासाठी अभिनयाचे धडेही घेतले आहेत.
अथर्वची सोशल मीडियावरील यशस्वी कामगिरी पाहून “अर्थव सुदामे किती कमावतो?”, असा प्रश्न नक्कीच पडला असेल. ‘झी युवा’च्या एका कार्यक्रमात अथर्वने त्याच्या कमाईबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना अथर्व म्हणाला, “माझा जो काही हिशोब आहे तो सर्व माझी बायको, आई-वडील, माझे मित्र हेच बघतात. ते मी बघत नाही. त्यामुळे मला एक आकडा सांगू शकत नाही. म्हणून मी किती कमावतो असं सांगू शकत नाही. मी फुल टाइम कॉन्टेन्ट क्रिएशन करु शकतो. माझं लग्न झालं आहे. तरी देखील मी हे काम पूर्ण वेळ करु शकतो. लग्न झाल्यानंतर जबाबदारी असतानाही मी पूर्ण हे काम करु शकतो इतके पैसे मी कमावतो”.
कंटेन्ट क्रिएटर असणारा अथर्व चित्रपट व जाहिरातींमध्येही झळकला. अथर्वने बॉईज ४ या चित्रपटातही झळकला. याशिवाय तो जाहिरातींमध्येही काम करताना पाहायला मिळाला.