शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुपरस्टार अल्लू अर्जुन पोलिसांच्या ताब्यात? फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण, अखेर सत्य आलं समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 22, 2024 | 12:19 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
allu arjun viral photo

सुपरस्टार अल्लू अर्जुन पोलिसांच्या ताब्यात? फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण, अखेर सत्य आलं समोर

दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या भूमिकेने सर्वांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन. अल्लूने आतापर्यंत अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोन वर्षापूर्वी त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. आता या वर्षी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता अल्लू अर्जुन एका आरटीओ ऑफिसमध्ये पाहायला मिळाला. त्याचे फोटो व्हायरल झाले असून सर्वत्र चर्चा रंगली आहे. (allu arjun viral photo)

अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा- द रुल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याचे आरटीओच्या ऑफिसमधील फोटो व्हायरल झाल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्याला अटक केल्याच्या चर्चाना उधाण आले. पण जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यामागील खरं कारण समोर आले आहे.

आणखी वाचा – ऐकावं ते नवलंच! बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडूनच रणवीर सिंह बाळाला सांभाळण्याचे घेत आहे धडे, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

Pushpa star Allu Arjun visits RTO Khairtabad for International Driving Licence #Hyderabad. pic.twitter.com/aIsbt76U70

— Arbaaz The Great (@ArbaazTheGreat1) March 20, 2024

‘पिंकविला’च्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन खैरताबाद येथील आरटीओ ऑफिसमध्ये गेला होता. ‘पुष्पा-द रुल’ या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय ठिकाणी सीन चित्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेण्यासाठी तो तिथे गेला होता. या चित्रपटांमध्येदेखील दमदार सीन असणार आहेत. ॲक्शन सीन करण्यासाठी अभिनेत्याकडे आंतरराष्ट्रीय वाहन परवाना असणे गरजेचे आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन या ऑफिसमध्ये पोहोचला आहे.

आणखी वाचा – “१३ वर्षांपासून आमच्यात शारीरिक संबंध…”, ‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांचे IAS पत्नीवर गंभीर आरोप, म्हणाले, “ती वेगळ्या…”

अर्जुनने नुकताच विजागचा दौरा केला होता. तेथेही त्याचे जंगी स्वागत करण्यात आले होते. तेथील सर्व फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मिळलेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा- द रुल’ या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरदेखील एका खास भूमिकेमध्ये दिसणार आहे. पण तिची भूमिका नक्की काय असेल याबाबत मात्र कोणताही खुलासा झालेला नाही.

दरम्यान काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा-द रुल’ या दुसऱ्या भागानंतर याचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी घोषणा करण्यात आली होती. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाने विक्रमी कमाई केली होती. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री रश्मिका मंदना दिसली होती. तसेच अभिनेता फहाद फाजील खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाचा शेवट अल्लू अर्जुन व फहादच्या मारमारीने झाला होता त्यामुळे पुढे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.   

Tags: allu arjunRTO officesuperstar allu Arjunvisit
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shiva Serial New Promo

बहिणीच्या लग्नासाठी शिवा स्वतःचं गॅरेज गहाण ठेवणार का?, 'शिवा' मालिकेमध्ये पुढे काय घडणार?, प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.