बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ या मालिकेने आजवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. १९८८ साली सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या घरात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे ‘कुंती’. अभिनेत्री नाजनीन यांनी यामध्ये ‘कुंती’ ची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे त्यांना खूप पसंती मिळाली होती. पण या आधी त्या अनेकदा मोठ्या पडद्यावरही दिसून आल्या होत्या. सध्या नाजनीन काय करतात हे जाणून घेऊया. (Mahabharat fame actress nazneen)
‘महाभारत’मध्ये ‘कुंती’ची भूमिका करणाऱ्या नाजनीन यांनी चित्रपटांमध्येही काम केले होते. १९७२ साली तिने ‘सा-रे-गा-मा-पा’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. याव्यतिरिक्त अजून दोन चित्रपटांमध्ये काम केले होते मात्र काही कारणांमुळे ते प्रदर्शित होऊ शकले नाहीत.

त्यांना अनेक चित्रपटांमध्ये बहीणींच्या भूमिका मिळण्यास सुरुवात झाली. मात्र त्यांना मुख्य भूमिका करायच्या होत्या. त्यांनी आपल्या करिअरमध्ये २२ चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये अनेक बी ग्रेड चित्रपटदेखील होते. १९७४ साली त्यांनी ‘कोरा कागज’ या चित्रपटामध्ये जया बच्चन यांच्या बहिणीची भूमिका केली होती. या भूमिकेने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर १९७६ साली त्यांनी ‘चलते चलते’ व १९७७ साली त्या ‘दिलदार’ या चित्रपटामध्ये दिसून आल्या होत्या. या सर्व चित्रपटांमध्ये त्या बहिणीच्या भूमिकेमध्ये दिसून आल्या होत्या. पण ‘चलते चलते’ या चित्रपटामध्ये त्यांनी बिकिनी परिधान केली होती. तेव्हा मात्र त्या जास्तच चर्चेत आल्या होत्या. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘आदमखोर’ हा होता. हा चित्रपट १९८६ साली प्रदर्शित झाला होता.
त्यांना चित्रपटांमध्ये हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी लहान पडद्यावर काम करण्याचा विचार केला. अशातच त्यांना बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ही मालिका मिळाली. पण या मालिकेमध्ये त्यांना आईची भूमिका मिळाली असल्याने पुढे त्यांना कधीही मुख्य भूमिका करण्यासाठी मिळाली नाही. ‘कुंती’ हे अजरामर भूमिका मिळाल्यानंतरही त्या अभिनय क्षेत्रात स्वतःला सिद्ध करु शकल्या नाहीत आणि मनोरंजन विश्वापासून पूर्णतः लांब झाल्या.