कलाकारांना पडद्यावर पाहणं जितकं रंजक वाटत तितकाच त्यांच्या खऱ्या आयुष्यात काय सुरूय, त्यांचा इथवरचा प्रवास, त्यांचं बालपण या बाबतही जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशीच काहीशी साऱ्यांच्या दिलावर राज्य करणाऱ्या एका कलाकाराच्या बालपणीची आठवण समोर आली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापने अल्पावधीतच साऱ्या महाराष्ट्राला आपलंस केलं. त्याच्या अभिनयाची जादू तर साऱ्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतेय. पृथ्वीक सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. त्याच्या एका इन्स्टा स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.(pruthvik pratap post)
पहा गावच्या आठवणीत पृथ्वीकची खास पोस्ट (pruthvik pratap post)
पृथ्वीकने त्याच्या इन्स्टा स्टोरीला त्याच्या मोठ्या भावाने शेअर केलेला एक फोटो रिपोस्ट केला होता. पृथ्वीकचा भाऊ प्रतीक कांबळेने त्याच्या इंस्टाग्रामवर पृथ्वीक आणि त्याचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता आणि सोबत कॅप्शन देत लिहिलं होत की, ‘गावच्या घरातलं हे जुनं कपाट आणि त्याच्या आरश्यावरचा हा माझा आणि पृथ्वीकचा लहानपणीचा फोटो..माझ्या आजीने आम्ही लहान होतो तेव्हापासून आरश्याला लावून ठेवलाय..तो आजही तसाच आहे.. घरात आल्यावर ह्या फोटोकडे पाहिलं की जाणवतं गांव म्हणजे आपली मुळं आपलं अस्तित्व असे का म्हणतात..’ असे म्हणत प्रतीक ने पृथ्वीकला हा फोटो टॅग करत पोस्ट केलाय.

दरम्यान पृथ्वीकचा लहानपणीचा फोटो समोर आला असून या फोटोमध्ये पृथ्वीक खूपच गोड दिसत आहे. पृथ्वीक आणि प्रतीक यांच्यातील बॉण्डही खूप घट्ट आहे. भाऊ म्हणून नेहमीच ते दोघे एकमेकांना साथ देतात आणि एकमेकांच्या यश अपयशात एकमेकांसोबत असतात.(pruthvik pratap post)
====
हे देखील वाचा – क्रांती रेडकरच्या मुलींचे फोटो आले समोर
====
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील सर्वांचा लाडका असा एक अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप. मालिकाविश्वात पृथ्वीकने काम केले मात्र पृथ्वीकला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळेच. या लोकप्रिय कार्यक्रमामुळे पृथ्वीकला खरी ओळख मिळाली. पृथ्वीक मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ८३ या हिंदी चित्रपटात त्याने काम केलं आहे. कलाकारांच्या बालपणीच्या फोटोंमध्ये पृथ्वीकचा हा बालपणीचा फोटो नक्कीच चाहत्यांच्या मनावर राज्य करेल यांत शंका नाही.
