शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video: अमिताभ बच्चन एकदम ठणठणीत, प्रकृतीबाबत स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “हे सर्व खोटं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 16, 2024 | 10:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amitabh bachchan update

अमिताभ बच्चन एकदम ठणठणीत, प्रकृतीबाबत स्वतःच केला खुलासा, म्हणाले, "हे सर्व खोटं..."

 बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन हे सध्या अधिक चर्चेत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. पण  शुक्रवारी त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता. काहीं तासानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना घरी आणण्यात आले आहे आणि प्रकृतीही स्थिर असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थनाही केल्या. (amitabh bachchan update)

शुक्रवारी त्यांना हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी भरती करण्यात आले होते. पण ही शस्त्रक्रिया त्यांच्या हृदयावर झाली नसून पायामध्ये क्लॉट असल्याने पायाची शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले. पण अशातच आता त्यांच्या या सर्व वृत्तावर स्वतः अमिताभ यांनी मौन सोडले आहे. शस्त्रक्रियेच्या वृत्तानंतर ते सायंकाळी अभिनेता अभिषेक बच्चन व क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर आयएसपीएल टी १०’ मॅचचा आनंद घेताना दिसले. त्यांना बघून चाहते मात्र संभ्रमात पडले. नक्की त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली की नाही यावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर आता अमिताभ यांनी खुलासा केला आहे.

आणखी वाचा – ‘मराठी पाऊल पडते पुढे’! पुरस्कार मिळताच प्रिया बापट भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “महाराष्ट्राला अभिमान वाटणं…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मॅच झाल्यानंतर तिथून निघत असताना मीडियाने त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथील पत्रकारांनी त्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारले. हे ऐकून ते थोडे थांबले आणि म्हणाले ‘खोटी बातमी. हे ऐकून तेथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

आणखी वाचा- ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटानंतर रणदीप हुड्डा राजकारणात प्रवेश करणार?, प्रश्न विचारताच म्हणाला, “ही योग्य वेळ…”

अमिताभ यांच्या आरोग्यविषयक बातमीबद्दल गोंधळ झाला असला तरीही चाहत्यांना मात्र ते सुखरूप असल्याचे ऐकून दिलासा मिळाला आहे. सध्या अमिताभ अनेक चित्रपटांमध्ये दिसून येऊ शकतात. यामध्ये ‘सेक्शन ८४’, ‘कल्की २८९८-AD’, ‘आंखे २’ व ‘तेरा यार हू मै’ या चित्रपटांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी ते अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यादरम्यान कुटुंबासमवेत दिसले होते. तेव्हा ते सर्व कार्यक्रमामध्ये आनंदाने सहभागीही झाले. मुंबईला परत आल्यानंतर त्यांनी ‘वनतारा’बद्दलचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

Tags: actoramitabh bachchanbollywood actorfake newshealth updatehindi actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Priyanka Chopra

…म्हणून लेकीसह भारतात परतली प्रियांका चोप्रा, ईशा अंबानीलाही भेटायला गेली अन्…; खरं कारण आलं समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.