आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावने तब्बल ११ वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शकक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. आमिर खानबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर तिने आपल्या कामाकडे लक्ष देण्याचे ठरविले. आमिर व किरण नात्याने वेगळे झाले असले तरीही व्यवसायक्षेत्रांमध्ये एकत्र काम करताना दिसत आहेत. आमिर खान प्रोडक्शन निर्मित असलेला चित्रपट ‘लापता लेडीज’च्या निमित्ताने दोघं एकत्रित काम करत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दोघं अनेकदा स्पॉटही झाले. हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंतीही दर्शवली. अशातच अभिनेता सलमान खानने किरणबद्दल एक भाष्य केले आहे त्यावरुन त्याला ट्रोल करण्यात येत आहे. ( Salman khan on kiran rao)
‘लापता लेडीज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट सर्व समीक्षक व चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चित्रपटाचा रिव्हयूदेखील शेअर करत आहेत. अशातच सलमाननेही हा चित्रपट वडील सलीम खान यांच्याबरोबर पाहिला. त्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे की, “आताच मी किरणचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट पाहिला. वाह किरण. मी व माझ्या वडिलांनी या चित्रपटाचा आनंद घेतला. दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट केल्याबद्दल तुझे अभिनंदन. तू माझ्याबरोबर कधी काम करशील?”.

सलमानची ही पोस्ट व्हायरल होताच पोस्ट शेअर करुन त्यावर अनेक टीका करण्यात आल्या. पण नक्की कोणती चूक होती हे चाहत्यांनी त्याला दाखवून दिले. सलमानने आपल्या पोस्टमध्ये किरणचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असल्याचे लिहिले होते. पण किरणचा हा पहिला चित्रपट नसून तिने याआधी २०१० साली ‘धोबी घाट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
चाहत्यांनी ही पोस्ट व्हायरल करुन एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत की किरणचा हा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट आहे”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “भाई, तुम्ही विसरलात का? ‘धोबी घाट’ हा चित्रपटदेखील किरण रावनेच दिग्दर्शित केला होता”.
२०१० मध्ये आलेल्या ‘धोबी घाट’ या चित्रपटाचे खूप कौतुक केले होते. पण आता किरण सलमानबरोबर कोणता चित्रपट करेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.