सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. पुढच्या महिन्यात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. भारतामध्ये अनेक कलाकार आहेत जे मुसलमान असून हिंदू धर्माचे सणही साजरे करतात. त्यातील एक म्हणजे बॉलिवूडचा किंग शाहरुख खान. शाहरुखने हिंदू असलेल्या गौरीबरोबर लग्न केले. गौरीबरोबर लग्न केल्यानंतर त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले पण त्याची उत्तरे तो नेहमीच संयमाने देत असे. (shahrukh khan on religion)
अनेक यशस्वी चित्रपट करुन बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.मूळचा दिल्लीचा शाहरुख खानने मुंबईमध्ये स्थायिक झाला. त्याने प्रेयसी असलेल्या गौरीबरोबर १९९१ साली लग्न केलं. मुसलमान असून हिंदू मुलीबरोबर लग्न केल्याने त्याला विचारण्यात आले की, “तो मुसलमान आहे आणि पत्नी हिंदू तर त्यामुळे काही समस्या येतात का?”, “आर्यन,सुहाना व अबराम कोणत्या धर्माचे पालन करतात?”, “त्याच्या घरी कोणता धर्म मानतात?”, अशा अनेक प्रश्नांवर शाहरुखने प्रसारमाध्यमांना उत्तरे दिली आहेत.
शाहरुख व गौरी यांनी आपल्या आयुष्यात कधीही धर्माला महत्त्व दिले नाही. ते प्रत्येक सण साजरा करतात. त्यांनी आपल्या मुलांना दोन्ही धर्माची शिकवण दिल्याचे अनेकदा शाहरुखने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं होतं की, “आम्ही कधीही हिंदू व मुसलमान असं म्हणत नाही. आमची मुलं हिंदुस्तानी आहेत. जेव्हा माझी मुलगी शाळेत जात होती तेव्हा तिला एक फॉर्म भरण्यासाठी मिळाला. त्यामध्ये धर्माबद्दल विचारण्यात आले होते. ती लहान होती पण मला आपला धर्म कोणता आहे असे तिने विचारले. त्यावर तिला मी म्हणालो की आपण भारतीय आहोत. आपला कोणताही धर्म नाही आणि असायला पण नको”.
याबरोबरच त्याने अजून एका मुलाखतीमध्ये धर्मावर भाष्य केलं होतं. ती म्हणाली की, “मी मुसलमान कुटुंबात वाढलो. माझ्यावर ते संस्कार आहेत. पण मला जर रामायणातील वानराची भूमिका करायची असेल तर मी हिंदूत्वही शिकलो आहे. गौरीबरोबर लग्न झाल्यानंतर तिने मला खूप काही शिकवलं. माझ्या घरी ‘भगवद्गीता’ व ‘कुराण’ हे दोन्हीही धर्मग्रंथ आहेत. त्यातील बऱ्याच गोष्टी आम्ही मुलांना शिकवत असतो. आमच्या घरी एक लहान भारतच आहे”.
शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २०२३ मध्ये ‘पठाण’, ‘जवान’ व ‘डंकी’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला होता.