बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मालक रुग्णालयामध्ये भरती, हत्तीला राहवेना तिथेच भेटायला आला अन्…; बेडवर पाहून कुरवाळत राहिला, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 14, 2024 | 6:15 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Elephant Viral Video

Video : मालक रुग्णालयामध्ये भरती, हत्तीला राहवेना तिथेच भेटायला आला अन्...; बेडवर पाहून कुरवाळत राहिला, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

सिंह, वाघ व बिबट्या यांसारख्या वन्य प्राण्यांपासून सुरक्षित राहण्याचा सल्ला मनुष्य वर्गाला नेहमीच दिला जातो, तर काही वन्य प्राणी आहेत ज्यांना मनुष्यवर्ग फारसा घाबरत नाही, कारण त्यांना मानवांचे साथीदार म्हटले जाते. यामध्ये हत्तींचाही समावेश आहे. पृथ्वीवरील हा सर्वात मोठा राक्षस शतकानुशतके मानवांसह राहत आहे. पूर्वीच्या काळी राजे व सम्राट त्यांच्यावर स्वार व्हायचे आणि त्यांचा वापर युद्धातही करायचे. खरं तर हे प्राणी मैत्रीपूर्ण आहेत. सध्या सोशल मीडियावर हत्तीशी संबंधित एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवर लोकांची मन जिंकली आहेत. (Elephant Viral Video)

सदर व्हिडीओमध्ये एक हत्ती आपल्या त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजे केअरटेकरला भेटायला हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. जेव्हा त्याला त्याच्या केअरटेकरच्या आजारपणाबाबत कळते तेव्हा तो हत्ती रुग्णालयात पोहोचतो. व्हिडीओमध्ये असं पहायला मिळत आहे की, हत्ती दरवाजाजवळ बसला आहे आणि हळू हळू रेंगाळत हॉस्पिटलच्या खोलीत जाताना दिसत आहे. केअरटेकरजवळ पोहोचताच हत्ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण केअरटेकर खूप आजारी व वयोवृद्ध असल्याने त्यांना बेडवरुन हलता येत नाही, म्हणून शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेने त्या वयोवृद्ध इसमाचा हात हत्तीच्या सोंडेला लावायला मदत केली. हत्तीचे माणसावर इतके प्रेम तुम्ही याआधी क्वचितच पाहिले असेल.

आणखी वाचा – घरामध्ये तुम्ही ‘या’ पाच गोष्टी करत असाल तर कधीच होणार नाही पैशांची भरभराट, वेळीच टाळा अन्यथा आर्थिक नुकसान वाढणार

An elephant comes to visit it's elderly human companion in village hospital … ????pic.twitter.com/QMx14Jlx0c

— Figen (@TheFigen_) March 13, 2024

हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अवघ्या २७ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत २.२ मिलियन म्हणजेच २२ लाख वेळा पाहिला गेला आहे, तर ३६ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे.

आणखी वाचा – एकाचवेळी अनेक मुलींना डेट करायचा रणबीर कपूर, दीपिका पदुकोणलाही फसवलं, रंगेहाथ पडकलं होतं अन्…

त्याचप्रमाणे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “माणसांनी त्या हत्तीचे काहीतरी चांगले केले असेल, कारण जर तुम्ही माणसांचे चांगले केले तर ते लगेच विसरतात, पण प्राणी कधीच विसरत नाहीत”, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, “जेव्हा हत्ती त्याच्या मानवी मित्राला भेटायला येतो हा एक हृदयस्पर्शी क्षण आहे”.

Tags: Elephant Viral Videoemotional viral videoInstagram viral videoviral video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Siddharth Jadhav's damaged bag has been compensated by Indigo air line company see the details

विमान प्रवासादरम्यान गैरसोय झाल्यानंतर भडकलेला सिद्धार्थ जाधव, कंपनीने माफी मागत दिली नुकसान भरपाई, व्हिडीओही केला शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.