लहान पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील कलाकार काही न काही कारणाने चर्चेत असतात. नुकतीच या मालिकेतील ‘सोनू’ची भूमिका साकारणारी झील मेहताने मालिकेतील एग्जिटबद्दल खुलासा केल्याने चर्चेत आली होती. पण आता ‘बबिता’ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता व ‘टप्पू’च्या भूमिकेत असलेला राज अनादकट यांच्या डेटिंगच्या बातम्या सोशल माध्यमावर होत होत्या. पण आता त्यांच्याबद्दलच्या आलेल्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (munmun dutta and raj anadkat engagement )
मिळालेल्या माहितीनुसार, मुनमुन व राज यांनी मुंबईबाहेर साध्या पद्धतीने साखरपुडा केल्याचे समोर आले आहे. गुजरातमध्ये त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला . तसेच त्या दोघांच्याही नात्याला कुटुंबांनी स्वीकारल्याचेही समोर आले असून केवळ घरच्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे.
२०१७ मध्ये राजने ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेमध्ये ‘टप्पू’ची भूमिका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेकदा मुनमुन व राज एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मुनमुनचे वय ३६ असून राज २७ वर्षाचा आहे. दोघांच्याही वयामध्ये ९ वर्षांचे अंतर आहे. त्यावेळी अनेकांनी दोघंही ही नातं पुढे नेतील अशी आशा बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांच्या साखरपुड्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांच्या मते ‘तारक मेहता का…’ या मालिकेतील सर्वांना मुनमुन व राजच्या नात्याबद्दल कल्पना होती. मात्र दोघांनीही याबद्दलची अधिकृत घोषणा केली नव्हती. त्यानंतर मुनमुनने मात्र आपल्या सोशल मीडियावरुन या वृत्ताचे खंडन केले होते.
२००८ पासून ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याधील प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख मिळाली आहे. या मालिकेतील आवडते पात्र दया म्हणजे अभिनेत्री दिशा वकानीने बाळंतपणासाठी मालिका सोडली होती. पण ती पुन्हा परत मालिकेमध्ये दिसेल असे निर्मात्यांनी स्पष्ट केले होते. मात्र बराच आकाळवधी गेला तरीही दिशा वकानी परतली नाही त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.