अनेक टीव्ही मालिकांमधील बाल कलाकार बरेचदा चर्चेत आलेले पाहायला मिळाले. आता हे बालकलाकार म्हणून काम करणारी मुले मोठी झाल्यानंतर बरेचदा सिनेसृष्टीपासून दूर जात वेगळ्या क्षेत्रात काम करताना दिसतात. तर काही मुले ही अजूनही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अशातच ‘उत्तरन’ मालिकेतील चर्चेत असलेली लहान मुलींची जोडी विशेष चर्चेत राहिली. ‘उत्तरन’ ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर २००८मध्ये सुरु झाली. या मालिकेने २०१५ साली प्रेक्षकांचा निरोप घेतला. (Uttaran Child Artist)
‘उत्तरन’ या मालिकेत दोन मुलींची कथा दाखवण्यात आली. त्यापैकी एक मोलकरणीची मुलगी इच्छा आणि दुसरी मालकीणीची मुलगी तपस्या आहे. या दोघांच्या बालपणीच्या भूमिका स्पर्श खानचंदानी व इशिता पांचाळ यांनी साकारल्या होत्या. स्पर्श खानचंदानी व इशिता पांचाळ या दोघीही आता मोठ्या झाल्या आहेत. त्या शोदरम्यान तिचे वय ५ ते १० वर्षांच्या दरम्यान होते पण आता ती मोठी झाली आहे. या मालिकेमुळे दोघांची मैत्री झाली तेव्हापासून सुरु झालेली या दोन मैत्रिणींची मैत्री आजही तितकीच घट्ट आहे.
स्पर्श व इशिताने आजवर त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ‘उत्तरन’ मालिकेनंतर स्पर्शने ‘सीआयडी’मध्ये काम केले. त्यांनतर अभिनेत्रीने मालिकाविश्वातून ब्रेक घेत शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. यावेळी अभ्यासाबरोबरच स्पर्श सामाजिक कार्यही करत आहे. इच्छा या व्यक्तिरेखेतील स्पर्श प्रेक्षकांनाही प्रचंड आवडली होती त्यावेळी तिला या भूमिकेसाठी अनेक पुरस्कारही मिळाले होते. पण स्पर्श आता चित्रपट सृष्टीपासून दूर आहे. ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. त्याचप्रमाणे तिने सोशल मीडियावरचा वावरही कमी केला आहे.
इशिताबद्दल बोलायचे झाले तर, ‘उत्तरन’व्यतिरिक्त तिने इतर अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. तिने ‘एक विवाह ऐसा भी’, ‘भूत अँड फ्रेंड्स आणि रामा: द सेव्हिअर’सारख्या चित्रपटात काम केलं. चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. इशिता सोशल मीडियावरही सक्रिय नाही.
‘उत्तरन’ संपून अनेक वर्षे उलटली असली तरी इशिता पांचाल व स्पर्श खानचंदानी यांची मैत्री अजूनही कायम आहे.