शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पैशांसाठी McDonald मध्ये झाडू मारायचं काम करायच्या स्मृती ईराणी, एकता कपूरनेही कामासाठी नाकारलं अन्…; कसं बदललं आयुष्य?

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 13, 2024 | 4:43 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Smriti irani talked about her struggle life and recalls she was working at mcdonald see the details

पैशांसाठी McDonald मध्ये झाडू मारायचं काम करायच्या स्मृती ईराणी, एकता कपूरनेही कामासाठी नाकारलं अन्…; कसं बदललं आयुष्य?

सध्याच्या सक्रिय राजकारणातील काही महत्त्वाच्या राजकीय मंडळींपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे स्मृती इराणी. टेलिव्हिजन विश्वात सर्वात गाजलेल्या ‘क्योकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून साकारलेली तुलसी घराघरांत पोहचल्या आणि स्मृती इराणी सर्वांच्या लाडक्या झाल्या. त्यानंतर त्यांनी राजकारणात सहभाग घेतला आणि आता महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून स्मृती ईराणी यांचे काम गाजत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत स्मृती यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची विशेष आठवण करून दिली. यावेळी त्यांनी एकता कपूरने जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिने मला या शोसाठी नाकारलं होतं. मात्र, नंतर त्यांनी ज्योतिषाच्या सांगण्यावरुन मालिकेत घेतल्याचा खुलासा केला.

याबद्दल त्या म्हणाल्या की, “त्या दिवशी एकता कपूरच्या ऑफिसमध्ये जनार्दन नावाचे एक ज्योतिष बसले होते. त्यांनी मला सांगितलं की, “एक दिवस तू खूप मोठी कलाकार होणार आहेस”. ते माझ्याशी बोलत असताना मी एका कॉन्ट्रॅक्टवर सही करत होते. प्रत्यक्षात ती भूमिका कोणाच्या तरी बहिणीची वगैरे होती. परंतु, हे सगळं पडद्यामागे बसलेल्या एकता कपूरने पाहिलं. त्यांनी एकताला सांगितलं की, “तू हिच्याबरोबर काम केलंस तर, एक दिवस ही मुलगी देशभरात प्रसिद्ध होईल”.

View this post on Instagram

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

आणखी वाचा – “त्याची जागा…”, निलेश साबळेनंतर सुत्रसंचालक म्हणून ‘चला हवा येऊ द्या’मध्ये संकर्षण कऱ्हाडे, म्हणाला, “त्याने निर्माण केलेलं…”

यापुढे त्या असं म्हणाल्या की, “पंडितजींचं बोलणं ऐकून एकता लगेच मी नेमक्या कोणत्या करारावर सही करतेय हे पाहण्यासाठी बाहेर आली. एकताने ते संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट पाहिलं आणि फाडून टाकलं. त्यानंतर तिने मला तुलसी विरानीच्या भूमिकेसाठी माझी निवड केली. या भूमिकेसाठी एकताने मला किती पगार पाहिजे याबद्दल विचारलं तेव्हा तिला मी बाराशे रुपये प्रतिदिवस सांगितलं होतं. पण, एकताने स्वत:हून त्या करारावर अठराशे प्रतिदिवस मानधन लिहिलं होतं”. 

आणखी वाचा – Video : यालाच म्हणतात संस्कार! गावी जाऊन भजनी मंडळींमध्ये रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, अंगणात बसून भजन गातानाचा व्हिडीओ व्हायरल

यापुढे त्यांनी आपल्या संघर्षाबद्दल म्हटले की, “मी मॅकडोनाल्डमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होते, ज्यामध्ये मला दरमहा १८०० रुपये मिळत होते. आठवड्यातून सहा दिवस तिथे काम करायची आणि सुट्टीच्या दिवशी मी ऑडिशन देत असे. दरम्यान, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही या मालिकेमुळे स्मृती इराणींनी मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. मात्र ही मालिका संपल्यावर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला.

Tags: bollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsKyoki Saas Bhi Kabhi Bahu Thi FameMinister of Women and Child Welfaresmriti iraniक्योकी सास भी कभी बहू थी फेमबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीमहिला व बालकल्याण मंत्रीस्मृती इराणी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Shreyas Talpade Emotional

"श्वास संपला तरी…", मरण जवळून पाहिल्यानंतर श्रेयस तळपदेसाठी अभिनेत्याची कविता, बायकोलाही रडू कोसळलं, म्हणाला, "देवाबरोबर भांडत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.