शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रिचा चढ्ढाची गरोदरपणात अशी काळजी घेत आहे अली फझल, पोज देताना दिसले तेव्हा त्याने काय केलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 13, 2024 | 10:28 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Richa chadha baby bump

रिचा चढ्ढाची गरोदरपणात अशी काळजी घेत आहे अली फझल, पोज देताना दिसले तेव्हा त्याने काय केलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

अली फजल व रिचा चढ्ढा यांनी अलीकडेच त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची घोषणा केली होती. प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर अली व रिचा अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र स्पॉट होताना दिसले. क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स २०२४च्या प्रसंगी, अली व रिचा यांनी हजेरी लावली होती. यावेळी अली रिचाची काळजी घेताना दिसला. रिचाला सांभाळताना तो दिसला, त्याच्या या कृतीने साऱ्यांची मन जिंकली आहेत. (Richa chadha baby bump)

अली फजल व रिचा चढ्ढा काल रात्री क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स २०२४ मध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसले. रिचा चढ्ढा हिने अवॉर्ड नाईटसाठी केलेला पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला. अभिनेत्रीने निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता ज्यावर पांढऱ्या रंगाची नक्षी केली होती. याबरोबर तिने मॅचिंग दुपट्टाही घेतला होता. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लो आलेलाही दिसत होता. तर अली फजल काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये डॅशिंग दिसत होता. दोघांनीही एकत्र पोज दिली तर रेड कार्पेटवर फोटो क्लिक करताना रिचा चढ्ढा तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली.

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक फायदा, तर ‘या’ राशीच्या लोकांसाठी व्यवसायात निर्माण होणार नवीन संधी, जाणून घ्या…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अली व रिचाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहतेही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. रिचा व अलीने गेल्या महिन्यात आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली. दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ही आनंदाची बातमी दिली. या पोस्टसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “एक लहान हृदयाचा ठोका हा आपल्या जगातील सर्वात मोठा आवाज आहे”.

आणखी वाचा – प्रियांका, परिणीतीनंतर चोप्रा घराण्यातील ‘ही’ अभिनेत्री विवाहबंधनात अडकली, दिल्लीच्या केजरीवाल कुटुंबाची झाली सून

ऋचा व अली दोघेही २०२० मध्ये लग्न करणार होते पण करोना महामारीमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. नंतर, या जोडप्याने २०२२ मध्ये त्यांचे मित्र व कुटुंबीयांच्या उपस्थितीत शाही विवाहसोहळा पार पाडला. या जोडप्याने दिल्लीत त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन केले होते. त्यानंतर लखनऊमध्ये येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. रिचा व अलीने मुंबईत रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती.

Tags: Ali Fazalbollywood actressentertainmentRicha chada baby bumpRicha Chadha
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ranveer singh on orry

"त्याने तुम्हाला स्पर्श केला तर…", रणवीर सिंहने केलं ऑरीबाबत भाष्य, खिल्ली उडवत म्हणाला, “तो काय काम करतो ते…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.