गेल्या काही दिवसांपासून पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर जुळ्या मुलांना जन्म देणार अशा चर्चांना उधाण आले आहे. पण अशातच आता सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. सिद्धूच्या निधनानंतर त्याचे आई-वडील एकटे पडले होते. त्यामुळे IVF च्या मदतीने सिद्धूची आई ५८व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म देणार आहे असे सांगितले जात आहे. (siddhu moose wala mother)
सिद्धूच्या निधनाने सर्वांनाच दु:ख झाले होते. पण त्याच्या मृत्यूच्या काही कालावधीनंतर त्याची आई गरोदर असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या. अशातच आता सिद्धूच्या वडिलांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “आमच्या कुटुंबाची चिंता करणाऱ्या सिद्धूच्या चाहत्यांचे आम्ही आभारी आहोत. पण आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या कुटुंबाबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. अशा अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नये. जे काही वृत्त असेल ते आम्ही स्वतः तुमच्याबरोबर शेअर करु ”. त्यांच्या या पोस्टमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. ११ मार्च रोजी चरण कौर यांना डिलिव्हरीसाठी एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे वृत्त हाती आले होते.

सिद्धूची आई चरण कौर यांनी फेब्रुवारी महिन्यापासूनच बाहेर पडणं बंद केलं होतं. त्या घरी स्वतःची काळजी घेत आहेत असेही म्हणत आहेत. त्या स्वतः मूसाल गावाच्या सरपंच राहिल्या आहेत. त्यांचे कुटुंब हे कॉँग्रेस पार्टी समर्थक आहे.
आणखी वाचा-मावशी होणार हे कळताच दीपिका पदुकोणच्या बहिणीचं मोठं भाष्य, म्हणाली, “बाळाला बिघडविण्यात…”
२९ मे २०२२ रोजी बिष्णोई गँगने सिद्धूवर गोळीबार केला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी तो अवघ्या २८ वर्षाचा होता. त्याने आपल्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली होती.देशभरात त्याचे अनेक चाहते आहेत. त्याच्या मृत्यूनंतर मात्र सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली आहे. पण आईच्या गरोदरपणाच्या वृत्तानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.