अलीकडेच दीपिका पदुकोणने चाहत्यांसह ती आई होणार असल्याची गोड बातमी शेअर केली. तेव्हापासून दीपिका व रणवीर विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. दीपिकाच्या गरोदरपणाच्या बातमीनंतर अभिनेत्री कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्याही अफवा पसरल्या. कतरिना विमानतळावर अतिशय सैल पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली होती, त्यानंतर तिच्या गरोदरपणाच्या अफवा आणखीनच वाढल्या. मात्र, कतरिना कैफने पुन्हा एकदा या सर्व अफवा फेटाळून लावलेल्या पाहायला मिळत आहेत. (Katrina Kaif On Pregnancy Rumours)
कतरिना कैफ एका क्रिकेट सामन्यात सहभागी होण्यासाठी राजधानी दिल्लीत पोहोचली. यावेळी अभिनेत्री तिच्या टीमची जर्सी व जीन्समध्ये दिसली. कतरिनाने पुन्हा एकदा तिच्या स्पोर्टी अवताराने तिच्या गरोदरपणाच्या अफवांना पूर्णविराम दिला असल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी कतरिना कैफ संघांला चीअर करताना दिसली आणि ती यावेळी खूपच फिट दिसत होती.
Sweetheart ????????#katrinakaif pic.twitter.com/sypdGAy9TP
— Katy????imane.???????? (@kat16kaif) March 11, 2024
या सामन्यात कतरिनाने आपल्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा कतरिना असलेल्या व्हीआयपी बॉक्समध्ये असलेल्या बॉलिवूड कलाकारांवर होत्या. यावेळी उपस्थित अभिनेत्रीचे चाहतेही मोठ्याने कतरिनाच्या नावाचा जप करताना दिसले. दरम्यान तिने कधी हसत तर कधी हात हलवत चाहत्यांसह संवाद साधला. कतरिनाने चाहत्यांच्या फोनमध्ये सेल्फीही क्लिक केले. अभिनेत्रीच्या या मनमिळाऊ स्वभावाने चाहत्यांना खुश केलं.
आणखी वाचा – “याचा फोन फोडू का मी…”, फोटोग्राफरवर का भडकली सई ताम्हणकर?, व्हिडीओ होतोय व्हायरल
कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, कतरिना कैफ शेवटची विजय सेतुपती यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र खास कमाई करु शकला नाही. याशिवाय कतरिनाने आजवर तिच्या अभिनयाने व सौंदर्याने सिनेरसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. नुकतीच अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला कतरिनाने तिचा पती विकी कौशलसह हजेरी लावली.