शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गोष्टी वाढवून सांगितल्या…”, ‘प्रचारकी’ चित्रपटांबद्दल किरण करमरकरांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले, “त्या दोघांबद्दल…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 10, 2024 | 12:53 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kiran karmarkar talked about propaganda films he said There is nothing like that in this article 370

“गोष्टी वाढवून सांगितल्या...”, ‘प्रचारकी’ चित्रपटांबद्दल किरण करमरकरांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले, “त्या दोघांबद्दल...”

मराठीसह हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे किरण करमरकर. २००० सालच्या ‘कहाणी घर घर की’ या मालिकेतील ओम आगरवालच्या भूमिकेने किरण करमरकरांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशातच अभिनेते त्यांच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटातील एका भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

किरण करमरकर यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी बरीच पसंती दर्शवली आहे. त्यांचा अमित शाह यांच्या भूमिकेतील लूक सध्या व्हायरल होत असून त्यांच्या अभिनयाचेदेखील विशेष कौतुक होत आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने संवाद साधण्यासाठी किरण करमरकर यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘हॅशटॅग ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

आणखी वाचा – “आम्ही गुपचुप लग्न…”, आदिल खानबरोबरच्या नात्याबद्दल सोमी खानची प्रतिक्रिया, म्हणाली, “नकारात्मकता, वाद…”

यावेळी करमरकरांना “अशा प्रकारच्या चित्रपटांना बऱ्याचदा ‘प्रचारकी’ (प्रोपगंडा) चित्रपट म्हटले जाते, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्यांनी असे म्हटले की, “मला हा प्रचारपट वाटत नाही. तुम्ही फक्त ट्रेलर किंवा पोस्टर बघून ठरवणार असाल तर ते तुमचं दुर्दैव आहे. पण तटस्थ प्रेक्षक म्हणून चित्रपट पहिल्यानंतर लक्षात येते की, यापैकी काही गोष्टी आपल्याला माहीतच नव्हतं. ही एक घडलेली घटना आहे. हे आपल्या देशामध्ये झालं आहे. देशात कलम ३७० कसं हटवण्यात आलं? तेच या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.”

आणखी वाचा – ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाला नकार दिल्यामुळे ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्यावर टाकण्यात आला बहिष्कार, स्वत:च खुलासा करत म्हणाला…

यापुढे ते असं म्हणाले की, “प्रचारकी चित्रपट तेव्हाच होतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल काही गोष्टी वाढवून सांगितल्या जातात. मात्र या चित्रपटात त्या दोघांबद्दल (गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी) काहीही सांगण्यात आलेलं नाही. यामी गौतम ही या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आहे, खरंतर खऱ्या घटनेत तिचा काहीही संबंध नाही, पण चित्रपटात ती काल्पनिक पात्र म्हणून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे यात प्रचार असण्याचा काही संभवच येत नाही. जे घडलं आहे तेच या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.”  

Tags: article 370bollywood actorsBollywood entertainment newsbollywood moviesbollywood newsentertainment newshindi movieskiran karmarkarmarathi actorsआर्टिकल ३७०किरण करमरकरबॉलीवूड अभिनेतेबॉलीवूड चित्रपटबॉलीवूड बातमीबॉलीवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीमराठी अभिनेतेहिंदी चित्रपट
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Arjun bijlani appendix surgery successful wife neha swami expresses gratitude to fans and doctors see the details

अर्जुन बिजलानीच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट, पत्नी नेहा स्वामीने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “प्रत्येकाच्या प्रार्थना आमच्यासाठी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.