बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अर्जुन बिजलानीच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट, पत्नी नेहा स्वामीने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “प्रत्येकाच्या प्रार्थना आमच्यासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 10, 2024 | 1:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Arjun bijlani appendix surgery successful wife neha swami expresses gratitude to fans and doctors see the details

अर्जुन बिजलानीच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट, पत्नी नेहा स्वामीने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “प्रत्येकाच्या प्रार्थना आमच्यासाठी...”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे अर्जुन बिजलानी. अर्जुनने अनेक टीव्ही मालिकांमधून अभिनय करत चाहत्यांच्या हृदयात त्याचे विशेष स्थान निर्माण केले आहे. अशातच काल अर्जुन बिजलानीची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या तब्येतीबद्दलची माहिती दिली होती.

अर्जुनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याच्या हाताला सलाईन लावल्याचे दिसत होते. आपल्या हाताला सलाईन लावलेला फोटो शेअर करत त्याने “जे होतं ते चांगल्यासाठीच होतं” असंही लिहिलं होतं. त्यामुळे त्याचे अनेक चाहते चिंतेत पडले होते. अशातच आता अर्जुनच्या पत्नीने त्याच्या तब्येतीबद्दलची माहिती दिली आहे.

अर्जुनची पत्नी नेहा स्वामीने चाहत्यांना अभिनेत्याबद्दलच्या तब्येतीबद्दल माहिती देत असं म्हटलं आहे की, “अर्जुनची शस्त्रक्रिया चांगली झाली यासाठी मी डॉक्टर आणि देवाची खूप आभारी आहे. या कठीण काळात त्याच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल त्याच्या सर्व चाहत्यांचे आणि जवळच्या लोकांचे आभार… प्रत्येकाच्या प्रार्थना आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. खूप खूप धन्यवाद. ओम गं गणपतय नम:”

आणखी वाचा – “गोष्टी वाढवून सांगितल्या…”, ‘प्रचारकी’ चित्रपटांबद्दल किरण करमरकरांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले, “त्या दोघांबद्दल…”

पोटात दुखू लागल्याने अर्जुन बिजलानीला काल (९ मार्च) रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अभिनेत्याच्या पोटात अचानक अपेंडिसिटिसचा त्रास झाला. त्यामुळे पिंकविलाच्या वृत्तानुसार, अर्जुनला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आणि आता तो उत्तम असल्याची माहितीही त्याच्या पत्नीने दिली आहे.

आणखी वाचा – “आम्ही गुपचुप लग्न…”, आदिल खानबरोबरच्या नात्याबद्दल सोमी खानची प्रतिक्रिया, म्हणाली, “नकारात्मकता, वाद…”

दरम्यान, अर्जुन हा अभिनेता असण्याबरोबर एक उत्तम सूत्रसंचालकही आहे. अर्जुनने ‘जब हम तुम’, ‘इश्क में मरजावां’ तसेच ‘कवच’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमधून काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याव्यतिरिक्त अर्जुन ‘झलक दिखला जा 9’, ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये दिसला आहे. याशिवाय त्याने ‘डान्स दिवाने’ हा शोचे सूत्रसंचालनही केले आहे.  

Tags: नेहा स्वामीअर्जुन बिजलानीअर्जुन बिजलानी आरोग्य अपडेटमनोरंजन बातमीबॉलीवूड अभिनेताबॉलीवूड बातमीटीव्ही अभिनेताArjun bijlaniArjun Bijlani Health Updatebollywood actorbollywood newsentertainment newsNeha SwamiTv actor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Next Post
Malaika arora talk on a person wrote she could afford expensive dress because of fat alimony see the details

“पोटगीत मिळालेल्या पैशांमुळे मलायका आरोरा महागडे कपडे परिधान करते?” आरोप करणाऱ्या व्यक्तीवर भडकली अभिनेत्री, सडेतोड उत्तर देत म्हणाली...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.