शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Dolly Sohi Died : सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोहीचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, काही तासांपूर्वीच बहिणीचाही झाला होता मृत्यू

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 8, 2024 | 9:21 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Dolly Sohi And Sister Amandeep Sohi Death

Dolly Sohi Died : सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोहीचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, काही तासांपूर्वीच बहिणीचाही झाला होता मृत्यू

Dolly Sohi Passes Away : हिंदी मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दुःखद बातमी समोर येत आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही यांचे निधन झाले आहे. काही तासांपूर्वीच डॉलीची बहीण अमनदीप सोहीचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच आणखी एका धक्कादायक बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अमनदीपनंतर आता डॉली सोहीचेही निधन झाले आहे. डॉली सोही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने त्रस्त होती. गेले काही दिवस तिच्यावर उपचारदेखील सुरु होते, मात्र अभिनेत्रीची ही झुंज अपयशी ठरली आहे. नुकतीच ETimes TV ने ही डॉलीच्या निधनाची माहिती सर्वांबरोबर शेअर केली आहे.

ETimes च्या वृत्तानुसार, डॉलीच्या कुटुंबियांनी डॉलीच्या निधनाची बातमी शेअर करत असं म्हटलं की, “आमची प्रिय डॉली आज पहाटे तिच्या स्वर्गीय निवासस्थानासाठी रवाना झाली आहे. तिच्या अचानक निघून जाण्यानं आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. आज दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.” अभिनेत्रीच्या कुटुंबासाठी हा काळ खूप कठीण आहे. अवघ्या काही तासांतच त्यांच्या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डॉलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

View this post on Instagram

A post shared by Dolly Sohi (@dolly_sohi)

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : आजचा महाशिवरात्रीचा दिवस ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार फायदेशीर, आर्थिक भरभराटही होणार, जाणून घ्या…

डॉलीला काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तिची प्रकृती सुधारतदेखील होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला  ‘झनक’हा शोदेखील सोडावा लागला होता. केमोथेरपीनंतर ती जास्त काळ शूटिंग करू शकली नाही. डॉलीने टीव्ही इंडस्ट्रीत दीर्घकाळ काम केले.

आणखी वाचा – राखी सावंतच्या पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल, ‘या’ ठिकाणी पार पडला विवाह सोहळा

दरम्यान, डॉलीची बहीण अमनदीपनेही काही तासांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला आहे. तिला काविळीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा आजार वाढत गेला आणि किडनी निकामी होऊन तिला आपले प्राण गमवावे लागले.

Tags: Amandeep Sohi Died due to jaundice marathi newsbollywood actressBollywood Actress Passed AwayCervical CancerDeath Due to Cervical Cancerdeath newsDolly SohiDolly Sohi and her sister Amandeep Sohi died marathi newsDolly Sohi death cervical cancerDolly Sohi Died marathi newsDolly Sohi Passed AwayDolly Sohi Passes AwayDolly Sohi sister diedJhanak fame actress Dolly Sohi died at 48 Marathi Newsअमनदीप सोही यांचे कावीळमुळे निधनडॉली सोहीडॉली सोही आणि तिची बहीण अमनदीप सोही यांचे निधन मराठी बातम्याडॉली सोही निधनडॉली सोही बहिणीचा मृत्यूडॉली सोही मृत्यू कॅन्सरडॉली सोही मृत्यू बातमीडॉली सोही यांचे निधननिधन बातमीबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड अभिनेत्री निधनसर्व्हायकल कॅन्सर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Rakhi Sawant On Adil Khan Durrani Wedding

“मला रस्त्यावर आणलं, पैसे लुटले अन्…; पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीच्या लग्नानंतर राखी सावंतचे आरोप, म्हणाली, “तिच्याबरोबरही तो…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.