मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला रस्त्यावर आणलं, पैसे लुटले अन्…; पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीच्या लग्नानंतर राखी सावंतचे आरोप, म्हणाली, “तिच्याबरोबरही तो…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 8, 2024 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rakhi Sawant On Adil Khan Durrani Wedding

“मला रस्त्यावर आणलं, पैसे लुटले अन्…; पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीच्या लग्नानंतर राखी सावंतचे आरोप, म्हणाली, “तिच्याबरोबरही तो…”

आदिल खान दुर्रानी व राखी सावंत यांच्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. लग्न, घटस्फोट, आरोप-प्रत्यारोप या सगळ्यांमुळे ही जोडी विशेष चर्चेत राहिली. अशातच आता पुन्हा एकदा आदिल खान दुर्रानी चर्चेत आला आहे. अचानक समोर आलेल्या आदिल खानच्या लग्नाच्या बातमीने साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. आदिल खान दुर्रानीने अभिनेत्री सोमी खानसह लग्नगाठ बांधली. आदिल व सोमी यांच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर त्यांनी शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत आहेत. (Rakhi Sawant On Adil Khan Durrani Wedding)

आदिलने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले असून ३ मार्च २०२४ रोजी त्याचे लग्न झाले आणि आता दोघेही पती-पत्नी असल्याचे म्हटले आहे. आदिल खान दुर्रानी व सोमी खानच्या लग्नाची बातमी समोर येताच आता राखीने यावर मौन सोडलं आहे. ‘टेली टॉक इंडिया’शी बोलताना राखी सावंतने आदिलच्या या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. राखी म्हणाली, “हे धक्कादायक आहे, त्याने अजून मला घटस्फोट दिलेला नाही. आदिलने माझ्या आधी ५ ते ६ वेळा लग्न केले होते, त्या मुलींनीही घटस्फोट घेतला नव्हता, त्या सर्व अत्याचारानंतर पळून गेल्या आणि सर्वांनी माझ्याशी संपर्क साधला”.

आणखी वाचा – Dolly Sohi Died : सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोहीचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, काही तासांपूर्वीच बहिणीचाही झाला होता मृत्यू

View this post on Instagram

A post shared by Adil Khan Durrani (@iamadilkhandurrani)

राखी पुढे म्हणाली, “मला सोमीबद्दल जाणून आश्चर्य वाटले, आदिलने वर्षभरात मला खूप धमक्या दिल्या आहेत. आता तो तिच्याबरोबरही तेच करणार, त्याने माझे पैसे लुटले, मला रस्त्यावर आणले”, असं ती म्हणाली. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आदिल व सोमीच्या लगाच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, “आता खरा तांडव होणार आहे”. तर आणखी एका युजरने म्हटलं आहे की, “इतके घोटाळे केल्यानंतर कोणी लग्न कसे करु शकते?”.

आणखी वाचा – राखी सावंतच्या पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल, ‘या’ ठिकाणी पार पडला विवाह सोहळा

न्यूज १८च्या रिपोर्टनुसार, आदिल खान दुर्रानीने त्याच्या व सोमी खानच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. तो म्हणाला, “हे माझे पहिले लग्न आहे. सध्या आम्ही बेंगळुरूमध्ये आहोत. आम्ही लवकरच दोघेही मुंबईला रवाना होणार आहेत. मी लवकरच सर्व काही माहिती देईन”. आदिल व सोमीने जयपूरमध्ये गुपचूप लग्न केल्याची बातमी आहे.

Tags: Adil Khan Durraniadil khan durrani and somi khan weddingrakhi sawantRakhi Sawant On Adil Khan Durrani Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Dolly sohi sister Amandeep died of jaundice see the details

बहिणीच्या निधनानंतर काही तासांतच अभिनेत्री डॉली सोहीने सोडला जीव, तिलाही झाला होता गंभीर आजार, कुटुंबाला दु:ख सहन होईना

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.