शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’मधील सोनूने कायमचीच सोडली इंडस्ट्री, प्रसिद्धीकडे पाठ फिरवत आता करते ‘हा’ व्यवसाय, एकूण कमाई आहे…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 7, 2024 | 3:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jheel Mehta business

'तारक मेहता...'मधील सोनूने कायमचीच सोडली इंडस्ट्री, प्रसिद्धीकडे पाठ फिरवत आता करते 'हा' व्यवसाय, एकूण कमाई आहे...

टेलिव्हिजनवरील गाजलेला कार्यक्रम म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चश्मा’. या कार्यक्रमाने गेल्या १६ वर्षामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले होते. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील ‘सोनू’ची भूमिका साकरणारी झील मेहता ही हल्ली सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेतून बाहेर पाडण्याचे कारण सांगितले. तसेच ती तिच्या बॉयफ्रेंडबरोबर ती लग्नबंधनात अडकली. (Jheel Mehta business)

काही दिवसांपूर्वी ‘सोनू’ची भूमिका साकरणाऱ्या झीलने काही दिवसांपूर्वी शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असे तिने माध्यमांसमोर स्पष्ट केले होते. तसेच तीने आपल्या बॉयफ्रेंडबरोबर साखरपुडाही केला आहे. पण मालिका सोडल्यानंतरही ती खूप चांगले आयुष्य जगत आहे. मालिका सोडल्यानंतर तिने बीबीएची डिग्री घेतली. त्यानंतर तिने मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरवात केली. तिने याबद्दल व्लॉगवर खुलासा केला आहे.

आणखी वाचा- सचिन तेंडुलकरची लेक शुभमन गिलच्या आकंठ प्रेमात, दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पण वडिलांना मुलगा पसंत आहे की नाही?

View this post on Instagram

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

ती म्हणाली की, “मालिकेमधून बाहेर पडल्यानंतर बीबीए फायनान्समध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मेकअप आर्टिस्ट म्हणून काम सुरू केले आणि यामध्येच आपला बिजनेस सुरु केला. याबरोबरच ‘सेफ स्टुडंट हाऊसिंग’ या नावाने दूसरा व्यवसाय सुरू केला. जे लोक बाहेरून मुंबईमध्ये शिक्षणासाठी येतात त्यांच्यासाठी घर उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करते”, असे तिने सांगितले.

आणखी वाचा- Video : चुकीचा स्पर्श, कंबरेला हात लावला अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला चाहत्याकडून विचित्र वागणूक, सेल्फी घेताना घडला प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पुढे ती म्हणाली की, “मी दहावीमध्ये असल्याने परीक्षा होत्या. बोर्डाची परीक्षा महत्त्वाची असल्याने  ‘तारक मेहता…’ ही मालिका मी सोडली. तसेच टेलिव्हिजनवर अभिनय करणे ही माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. ही स्वप्न ‘तारक मेहता…’ या मालिकेमुळे शक्य झाले. आता मी माझे शिक्षणही पूर्ण केले आहे आणि सध्या मी माझ्या व्यवसायामध्ये लक्ष देत आहे”.

झील ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून सध्या तिचे ३ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या विविध फॅशनला नेहमी पसंती मिळते.    

Tags: hindi actressHindi serialjheel Mehtatarak Mehta ka oolta chashma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Supriya pathare shared her struggle and revealed that she work as a maid see the details

इतरांच्या घरची धुणी-भांडी करणं सुप्रिया पाठारेंनाही चुकलं नाही, स्वतः सांगितलेली घराची परिस्थिती, म्हणालेल्या, “रस्त्यावर बसून...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.