कलाकार मंडळी ही अभिनयाव्यतिरिक्त बरेचदा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. बरेचदा ही कलाकार मंडळी प्रमोशन म्हणा वा उद्घाटन सोहळ्यासाठी दौरे करताना दिसतात. अशाच एका कार्यक्रमात एका अभिनेत्रीने लावलेली हजेरी तिला महागात पडली आहे. साऊथ अभिनेत्री काजल अग्रवाल नुकतीच एका कार्यक्रमाला पोहोचली होती पण तिथे तिच्याबरोबर असे काही घडले ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. काजल अग्रवाल अलीकडेच तिचे वडील विनय यांच्याबरोबर हैदराबादमध्ये एका दुकानाच्या लॉंच सोहळ्याला पोहोचली होती. (Kajal Aggarwal Gets Uncomfortable)
दरम्यान, ट्विटरवर फिरणारा अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहता ती तिथे अस्वस्थ झाली असल्याचं समोर आलं. सेल्फी घेताना एका व्यक्तीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याने काजल अस्वस्थ दिसली. काजल अग्रवाल अलीकडेच हैदराबादमध्ये एका दुकानाच्या लाँचसोहळयात सहभागी झाली होती. स्टोअरच्या लॉंचिंगदरम्यान एक व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी तिच्याकडे आला. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो फोटो क्लिक करताना तिला स्पर्श करताना दिसत आहे आणि तिची कंबरेत हात घालत सेल्फी घेताना दिसत आहे. हे पाहून काजल खूपच घाबरलेली दिसत होती आणि त्या माणसाला तिच्यापासून दूर जाण्याचा इशारा करत होती.
या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून, चाहत्यांनी त्या व्यक्तीच्या वागण्यावर टीका केली आहे. मात्र, काजलने कार्यक्रमात कोणताच व्यत्यय येऊ दिला नाही. काजल ही पहिली अभिनेत्री नाही जिच्याबरोबर असे काहीसे घडले आहे. सारा अली खान, अपर्णा बालमुरली, आहाना कुमरा हे काही कलाकार आहेत ज्यांना कार्यक्रमांमध्ये अयोग्यरित्या स्पर्श करण्यात आला होता. २०२२ मध्ये काजलने तिच्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर काजलने सिनेमातून ब्रेक घेतला. यानंतर आता ती कामावर परतली असून लवकरच ती तेलुगु चित्रपट ‘सत्यभामा’ व तामिळ चित्रपट ‘इंडियन २’ मध्ये दिसणार आहे.
या कार्यक्रमात एनटीव्हीशी बोलताना ती म्हणाली, “मी खूप खुश आहे की, मला चित्रपटांमध्ये दमदार भूमिका करायला मिळतात. माझे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘सत्यभामा’, तसेच ‘इंडियन २’. या दोन्ही चित्रपटांसाठी मी खूप उत्सुक आहे. यानंतर आता मी चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत आहे”, असं अभिनेत्री म्हणाली.