शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

इतरांच्या घरची धुणी-भांडी करणं सुप्रिया पाठारेंनाही चुकलं नाही, स्वतः सांगितलेली घराची परिस्थिती, म्हणालेल्या, “रस्त्यावर बसून…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 7, 2024 | 3:58 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Supriya pathare shared her struggle and revealed that she work as a maid see the details

इतरांच्या घरची धुणी-भांडी करणं सुप्रिया पाठारेंनाही चुकलं नाही, स्वतः सांगितलेली घराची परिस्थिती, म्हणालेल्या, “रस्त्यावर बसून...”

‘तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालंना’…. स्त्रियांशिवाय या पूर्ण विश्वाची कल्पना करणे हे किती अवघड व क्लिष्ट आहे, हे या ओळीतून आपल्या लक्षात येईल. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ‘ती’चं एक अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना ‘ती’च्यामुळेच आपल्या जीवनाला अर्थ आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

उद्या ८ मार्च, जागतिक महिला दिन. राजकारण, समाजकारण, व्यवसाय, उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान यांसह मनोरंजन क्षेत्रातही स्त्रियांनी आपली बाजी मारली आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर पुरुषांच्या वरचढ जाऊन आपली मुशाफिरी करत आहे. मात्र बाई म्हटली की, ‘संघर्ष’ हा तिच्या पाचवीलाच पूजलेला. त्यात मनोरंजन क्षेत्रातील संघर्ष हा आगळाच. कुणाच्याही पाठिंब्याशिवाय मनोरंजनाच्या या चंदेरी दुनियेत आपल्या संघर्षाने स्वत:ला सोनेरी झळाळी बहाल करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. त्यापैकीच एक लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेत्री सुप्रिया पाठारे, चला तर आजच्या महिला दिनानिमित्त जाणून घेऊ, सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या संघर्षाबद्दल…

View this post on Instagram

A post shared by Supriya Pathare (@supriya_pathare75)

आणखी वाचा – बायकोला पुरस्कार मिळताच प्रसाद जवादेचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “बायको…”

मराठी मालिकांचा लोकप्रिय चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. सुप्रिया यांना अगदी लहानपणापासून घरातील जबाबदारी सांभाळावी लागली. त्यासाठी त्यांनी अनेक घरांची धुणी-भांडीही केली. याचबाबत त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाविषयी भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की, “मला एसीपी, इन्स्पेक्टर अशा काहीतरी क्षेत्रात करिअर करायचं होतं. पण तेव्हा घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. मी घरात सगळ्यात मोठी. आईने कधी शिक्षण घेण्यासाठी नकार दिला नाही. पण परिस्थितीबरोबर काम करणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे मी खूप गोष्टी केल्या आहेत. लोकांच्या घरी भांडी घासली, कपडे धुतले आहेत. रस्त्यावर अंडी व चणे घेऊन विकायला बसायचे”.

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस असणार खास, तर ‘या’ राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या

अभिनेत्रीने धुणीभांडी करत मनोरंजन सृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिचा संघर्ष नक्की सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. दरम्यान, आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून सुप्रिया यांनी त्यांचं उत्कृष्ट अभिनयकौशल्य सिद्ध केलं आहे. आजवर साकारलेल्या विनोदी, गंभीर तसेच नकारात्मक अशा प्रत्येक भूमिकेद्वारे सुप्रिया पाठारे यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

Tags: सुप्रिया पाठारेमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीमांनोरंजन बातमीentertainment newsmarathi actressmarathi entertainment newsMarathi newssupriya pathare
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Ashok saraf Sangeet Natya Academy Award

Video : अशोक सराफ यांना पुरस्कार स्वीकारताना पाहून बायको भावुक, निवेदिता सराफांनी शेअर केला व्हिडीओ, म्हणाल्या, "आम्ही दोघंही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.