मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर सतत चर्चेत असते. सारा इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे अधिक प्रसिद्ध आहे. आतापर्यंत तिचे नाव क्रिकेटपटू शुभमन गिलबरोबर अनेकदा जोडले गेले आहे. ही दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचेही बोलले जात आहे. २०२०पासून सारा व शुभमन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा हार्दिक पांड्याच्या एका कमेंटवरुन सुरु झाल्या. तेव्हापासून शुभमन व साराचे चाहते दोघांच्या नात्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. (Sara Tendulkar and shubhman gill)
नुकताच साराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यावरून शुभमन व सारा यांच्यामध्ये नातं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘एक्स’ युजरने साराचा व शुभमनचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सारा लाल रंगाच्या साडीमध्ये असून तिच्या बाजूला एक गोंडस कुत्रा उभा आहे. तर शुभमनचा एक जुना फोटो असून त्या फोटोमध्येही सारखाच कुत्रा बघायला मिळत आहे. त्यामुळे हा एकच कुत्रा आहे असे नेटकऱ्यांनी अंदाज बांधला. त्यामुळे दोघांच्या डेटच्या बातम्या खऱ्या असल्याचीही चर्चा होऊ लागली.
Connecting dots pic.twitter.com/T7jJRF1D5o
— Div🦁 (@div_yumm) March 6, 2024
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकाऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी लिहितो की, ‘कनेक्टिंग डॉग्स’, तर काहींनी हार्ट इमोजी दिल्या आहेत.याआधी सारा व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसून आली होती. ती त्यामध्ये खूप सुंदर दिसत होती. साराच्या या लूकवर चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या होत्या.
साराने तिचे शिक्षण लंडन युनिव्हर्सिटीमध्ये घेतले. तिने सध्या मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला असून ती तिचे अनेक फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत असते. तसेच शुभमन देखील भारतीय क्रिकेट टीमचा उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. भारतीय संघामध्ये तो अनेकदा उत्तम कामगिरी करताना दिसला आहे.