शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोणी गणपती बाप्पा तर कोणी शंकर महादेवाचे भक्त; मुस्लिम असूनही ‘या’ सुप्रसिद्ध सेलिब्रिटींना आहे हिंदू देवतांची पूजा करण्याचं वेड

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 5, 2024 | 6:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood Celebrities Follow Hindu Religion

Bollywood Celebrities Follow Hindu Religion

भारत आणि आपली भारतीय संस्कृती जगात नावाजली जाते. जगभरातून अनेक लोक ही संस्कृती पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी भारतात येत असतात. भारतीय संस्कृतीची एक खासियत म्हणजे केवळ भारतात सर्वधर्म समभाव या भावनेने प्रत्येक जण प्रत्येक धर्मातील संस्कृती जपताना पाहायला मिळतो.
या गोष्टीचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार आणि त्यांची प्रत्येक धर्माप्रती असलेली श्रद्धा.(Bollywood Celebrities Follow Hindu Religion)

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या धर्मासह भारतातातील प्रत्येक धर्मातील सण उत्सव तितक्याच श्रद्धेने, भक्तीने साजरे करताना दिसतात. पाहुयात मुस्लिमअसून देखील पूजा, अर्चना करणारे बॉलीवूडमधील काही कलाकार आणि त्यांचे काही खास फोटो. अभिनेता शाह रुख खान काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह पंजाब येथील गोल्डन टेम्पल येथे दर्शनासाठी गेला होता तर, भाईजान म्हणून ओळख असलेला दबंग अभिनेता प्रत्येक गणपती उत्सवात बाप्पाच्या आरतीमध्ये मंत्रमुग्ध होताना दिसतो.

आणखी वाचा- गलिच्छ भाषा, शिवीगाळ अन्…; कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो पाहून भडकला सुनिल पाल, सुनावले खडेबोल, म्हणाला, “लायकीही नाही की…”

सलमान, शाह रुख खान यांच्यासह सैफअली खान, करीना कपूर, अभिनेत्री सारा अली खान हे कलाकार देखील गणपती, दिवाळी साजरी करताना पाहायला मिळतात.सैफअली खानच्या घरातील देवाची पूजा करतानाचा फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. तर केदारनाथ चित्रपटाप्रमाणे खऱ्या आयुष्यातही अभिनेत्री सारा अली खान महादेवांच्या भक्तीत दंग होताना दिसते. काही दिवसांपूर्वी साराने उज्जैन येथील महाकाल मंदिरात जाऊन पूजापाठ केला होता.(Bollywood Celebrities Follow Hindu Religion)

आणखी वाचा- “कधीच कोणाच्या लग्नात नाचले नाही”, अंबानींच्या पार्टीत सेलिब्रिटींचा डान्स पाहून कंगना रणौतची टीका, स्वतःची लता मंगेशकरांशीही केली तुलना

बॉलीवूडमधील लाडकी जोडी म्हणजे कॅटरिना कैफ-विकी कौशल यांचा देखील बाप्पाची पूजा करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. तसेच अयोध्या येथे राम मंदिरांच्या स्थापनेला देखील या जोडीने उपस्थिती दर्शवली होती. बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खानच्या घरी देखील दरवर्षी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन केले जाते. केवळ बॉलीवूडच नाही तर प्रत्येक धर्मातील सण, उत्सव प्रत्येकजण मोठ्या उत्साहात साजरे करत असतो. गणपती, दिवाळी असो वा ईद किंवा क्रिसमस प्रत्येक सणाला भारतात समान महत्व दिलं जातं

Tags: diwaliganpati bappasaif ali khansalman khansara ali khanshah rukh khan
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Rajinikanth Trolled For His Behaviour

कामवाल्या बाईला रजनीकांत यांच्याकडून विचित्र वागणूक, कॅमेऱ्यासमोरच 'ती' कृती केल्यानंतर चाहतेही भडकले, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.