मनोरंजनसृष्टीत काही कलाकार त्यांच्या अभिनय, नृत्य, गायन अशा अनेक कलांनी प्रेक्षकांच मनोरंजन करत असतात. ‘दम’ या चित्रपटातील ‘बाबूजी जरा धिरे चलो’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मॉडेल, डान्सर याना गुप्ता सध्या काय करते तुम्हाला माहिती आहे का? बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई न करणार ‘दम’ हा चित्रपट मात्र चित्रपटातील या आयटम सॉंगमुळे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र या गाण्यातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी याना यानंतर मोठ्या पडद्यावर फारशी आपली छाप उमटवू शकली नाही.(Yana Gupta)
यानाचा जन्म २३ एप्रिल १९७९ रोजी बर्नो येथे झाला असून यानाची आई भारतीय तर वडील एक युरोपीय गृहस्थ होते. परंतु काही कारणास्तव यानाच्या वडिलांनी तिच्या आईला घटस्फोट दिला आणि आईनेच याना आणि तिच्या बहिणीचा सांभाळ केला (who is yana gupta) . पुढे शालेय शिक्षणानंतर यानाने मॉडेलिंग करण्याचे ठरवले आणि वयाच्या १६ व्यावर्षी यानाने मॉडेलिंग क्षेत्रात करिअर घडवण्यास सुरुवात केली. काही वर्ष मॉडेलिंग केल्यानंतर यानाने ब्रेक घेऊन भारतात यायचे ठरवले आणि ती पुणे येथे स्थायिक झाली.

पुणे येथे स्थायिक झाल्यानंतर यानाने ओशो यांच्या आश्रमात जाऊन काही काळ आध्यात्मात आपलं मन रमवलं. ओशो यांच्या आश्रमातच याना व सत्यकाम गुप्ता यांची भेट झाली. २००१ साली याना-सत्यम लग्नबंधनात अडकले परंतु फार काळ यांचा संसार टिकला नाही २००५ साली याना-सत्यकाम यांचा घटस्फोट झाला आणि दोघे वेगळे झाले. २००३ साली आलेल्या दम या चित्रपटातील एका गाण्यासाठी डान्सर म्हणून तिला विचारणा करण्यात आली आणि यानाची रुपेरी पडद्यावर एंट्री झाली.(Yana Gupta)
याना ने त्यानंतर ‘रक्त’, ‘मनोरमा’, ‘कैसे कहे’, ‘चलो दिल्ली’, ‘मर्डर २’, ‘स्टॅन्ड बाय’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमधील गाण्यांमध्ये नृत्य सादर केले. हिंदी चित्रपटांसह यानाने काही तामिळ, तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले. डान्स सादर केल्यानंतर याना खतरो के खिलाडी, झलक दिख लाजा या रिऍलिटी शोंमध्ये देखील दिसली होती. यानाने परफॉर्म केलेलं ‘बाबूजी जरा धीरे जाओ'(Babuji Jara Dhere Chalo) हे गाणं आज देखील अनेक पार्टीज मध्ये वाजवलं जातं.