बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी मोठ-मोठ्या अभिनेत्यांबरोबर चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावले आहे. काही अभिनेत्री टिकल्या तर काहींनी बॉलिवूडला कायमचा रामराम केला. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे आयेशा टाकिया. आयेशाने बॉलिवूडमधील अजय देवगण, अनिल कपूर, नागार्जुन, शाहिद कपूर अशा आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. परंतु सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली पाहायला मिळत आहे. नुकतीच ती तिच्या लूकमुळे प्रचंड व्हायरल झाली होती. पण तिने अभिनय का सोडला?, सध्या ती काय करते? हे जाणून घेऊया. (Bollywood actress ayesha takia)
आयेशाने २००० साली १४व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चुनर उड उड जाये’ या म्युजिक व्हिडीओमधून तिला अधिक ओळख मिळाली. त्यानंतर २००४ मध्ये ती ‘टार्जन:द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ‘सोचा ना था’, ‘सलाम ए इश्क’,‘वॉन्टेड’ व ‘पाठशाला’ यामध्येही ती दिसली होती. मुख्यतः ती सलमानबरोबर ‘वॉन्टेड’ मधून अधिक प्रकाशझोतात आली. २००९ मध्ये आलेला हा चित्रपट वर्षातील अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.पण त्यानंतर आयेशाने चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम केला. २००९ मध्ये तिने तिचा प्रियकर फरहान आजमीबरोबर लग्न केले. त्यावेळी तिचं वय २३ वर्षे होतं.
आयेशाचा पती फरहान आजमी हा समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांचा मुलगा आहे. तसेच तो एका रेस्टॉरंटचा मालक आहे. लग्नानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला. दोघांनाही एक मुलगा आहे. सध्या ती गोव्यामध्ये राहत असून पतीच्या व्यववसायात मदत करत आहे.
काही दिवसांपूर्वीच आयेशा तिच्या लूकमुळे अधिक चर्चेत आली होती. प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे तिचा चेहरा भरपूर बदलला आहे. तिला ओळखणेदेखील कठीण झाले आहे. ती नुकतीच मुंबई एअरपोर्टवर दिसून आली होती तेव्हा तिचा चेहरा सुजलेला दिसून आलं. तसेच तिचे वजनही वाढलेले दिसले. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या. या प्रतिक्रियांना तिने चोख उत्तरही दिले होते.