भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची चांगलीच धूम होती. जामनगर येथे हा तीन दिवसांचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमासाठी जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. सर्वजण हा सोहळा संपवून आपापल्या घरी परतले. अशातच ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (Amitabh bachchan on Ambani pre wedding function)
अमिताभ हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. X या सोशल मीडिया हँडलवरुन ते नेहमी आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. दर रविवारी ते ‘जलसा’बंगल्यावर येऊन चाहत्यांना अभिवादनही करतात. पण हा नित्यक्रम त्यांचा या रविवारी पाहायला मिळाला नाही. यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांच्या ब्लॉगमध्ये अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाचा अनुभव आणि ‘वनतारा’चा अनुभव शेअर केला आहे.
T 4939 … late yes , but never the pretense
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 3, 2024
त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “उशिरा आहे,पण कोणताही बहाणा नाही”. अमिताभ यांच्या या पोस्टमध्ये कोणताही थेट अर्थ नाही आहे. पण त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाबद्दल आणि वनतारा ॲनिमल पार्कबद्दल व्यक्त झाले आहेत. त्यानाई हेही सांगितले की, “असा अनुभव मी याआधी कधीही घेतला नव्हता”.
अमिताभ यांनी लिहिले आहे की, “रविवारी ‘जलसा’चे दरवाजे उघडले नाहीत. पण लग्न घराचे दरवाजे उघडे होते. सोहळा पार पाडून आता आम्ही परत आलो आहोत. मी सांगेन की असा अनुभव याआधी कधीही घेतला नव्हता. हे केवळ लग्न सोहळ्याचे वातावरणच नाही तर ‘वनतारा ॲनिमल पार्क’ची व्यवस्थाही चांगली होती”.

बिग बी पुढे लिहितात की, “हे देवा…हा खूप असाधारण अनुभव आहे. तसेच तिथे असलेल्या प्राण्यांसाठी एक वैज्ञानिक व्यवस्था आहे. ज्या प्राण्यांना चुकीची वागणूक दिली जाते त्यांना या पार्कमध्ये आणले जाते आणि तिथेच त्यांचे पालन-पोषण केले जाते. हा एक असा अनुभव आहे त्यावर फक्त बघूनच विश्वास ठेवता येईल. तुम्ही सर्वांनीही या पार्कला नक्की भेट द्या. तसेच ते पुढे लिहितात की, “श्लोक, मंत्रांचा जप आणि यजमानांद्वारे तयार केलेले वातावरण हे फारच मंत्रमुग्ध करणारे होते. हे सर्वच अविश्वसनिय होते. तर सध्या ही एक आनंदाची रात्र आहे”. अनंत व राधिका यांच्या सोहळ्यामध्ये अमिताभ यांनी डोनाल्ड ट्रंप यांची पत्नी इवांका ट्रंप यांची भेट घेतली. या दोघांचा बोलतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.