बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्न घराचे दरवाजे…”, अंबानींच्या कार्यक्रमामधून घरी परतल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांची पोस्ट, म्हणाले, “आम्ही परतलो पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 5, 2024 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amitabh bachchan on Ambani’s pre-wedding function

"लग्न घराचे दरवाजे…", अंबानींच्या कार्यक्रमामधून घरी परतल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांची पोस्ट, म्हणाले, "आम्ही परतलो पण…"

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची चांगलीच धूम होती. जामनगर येथे हा तीन दिवसांचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमासाठी जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. सर्वजण हा सोहळा संपवून आपापल्या घरी परतले. अशातच ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (Amitabh bachchan on Ambani pre wedding function)

अमिताभ हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. X या सोशल मीडिया हँडलवरुन ते नेहमी आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. दर रविवारी ते ‘जलसा’बंगल्यावर येऊन चाहत्यांना अभिवादनही करतात. पण हा नित्यक्रम त्यांचा या रविवारी पाहायला मिळाला नाही. यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांच्या ब्लॉगमध्ये अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाचा अनुभव आणि ‘वनतारा’चा अनुभव शेअर केला आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर जबरदस्ती, किस करण्याचा प्रयत्न अन्…; ‘त्या’ पार्टीमध्ये जॅकी श्रॉफ यांनी दारु पिऊन केला होता धिंगाणा, तेव्हा काय घडलं होतं?

T 4939 … late yes , but never the pretense

— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 3, 2024

त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “उशिरा आहे,पण कोणताही बहाणा नाही”. अमिताभ यांच्या या पोस्टमध्ये कोणताही थेट अर्थ नाही आहे. पण त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाबद्दल आणि वनतारा ॲनिमल पार्कबद्दल व्यक्त झाले आहेत. त्यानाई हेही सांगितले की, “असा अनुभव मी याआधी कधीही घेतला नव्हता”.    

आणखी वाचा – ‘पद्म विभूषण’ पुरस्कार विजेत्या वैजयंती माला यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट, म्हणाले, “संपूर्ण देशभरात त्यांना…”

अमिताभ यांनी लिहिले आहे की, “रविवारी ‘जलसा’चे दरवाजे उघडले नाहीत. पण लग्न घराचे दरवाजे उघडे होते. सोहळा पार पाडून आता आम्ही परत आलो आहोत. मी सांगेन की असा अनुभव याआधी कधीही घेतला नव्हता. हे केवळ लग्न सोहळ्याचे वातावरणच नाही तर ‘वनतारा ॲनिमल पार्क’ची व्यवस्थाही चांगली होती”.

बिग बी पुढे लिहितात की, “हे देवा…हा खूप असाधारण अनुभव आहे. तसेच तिथे असलेल्या प्राण्यांसाठी एक वैज्ञानिक व्यवस्था आहे. ज्या प्राण्यांना चुकीची वागणूक दिली जाते त्यांना या पार्कमध्ये आणले जाते आणि तिथेच त्यांचे पालन-पोषण केले जाते. हा एक असा अनुभव आहे त्यावर फक्त बघूनच विश्वास ठेवता येईल. तुम्ही सर्वांनीही या पार्कला नक्की भेट द्या. तसेच ते पुढे लिहितात की, “श्लोक, मंत्रांचा जप आणि यजमानांद्वारे तयार केलेले वातावरण हे फारच मंत्रमुग्ध करणारे होते. हे सर्वच अविश्वसनिय होते. तर सध्या ही एक आनंदाची रात्र आहे”. अनंत व राधिका यांच्या सोहळ्यामध्ये अमिताभ यांनी डोनाल्ड ट्रंप यांची पत्नी इवांका ट्रंप यांची भेट घेतली. या दोघांचा बोलतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Tags: amitabh bachchanAmitabh bachchan blogAmitabh bachchan tweetanant ambani
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Haldi or mehndi to bride and groom in marriage What is the exact reason see the details

लग्नाआधी हळद का लावली जाते?, नवरी मुलीच्या हातावर मेहंदी का काढतात?, 'ही' आहेत महत्त्वाची कारणं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.