गेले काही दिवस सोशल मीडियावर सर्वत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचीच चर्चा रंगली होती. अशातच नुकताच हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला जगाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळे दिग्गज लोक उपस्थित होते. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. वेडिंग सेलिब्रेशनमध्ये शाहरुख, सलमान व आमिर या तिघांनी ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ गाण्यावर डान्स केला.
या कार्यक्रमात या चित्रपटाचा नायक राम चरणदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे त्यानेही या तीन खानबरोबर गाण्यावर ठेका धरला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यावेळी शाहरुखच्या एका कृतीमुळे तो सध्या सोशल मीडियावर टीकेचा धनी झाला आहे. शाहरुख खानने राम चरणला स्टेजवर बोलावताना ‘इडली’ शब्दाचा वापर केला होता, त्यामुळे चाहते चांगलेच संतापले आहेत. राम चरणच्या मेकअप आर्टिस्ट झेबा हसनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शाहरुखवर टीका केली आहे.

राम चरणची मेकअप आर्टिस्ट झेबा हसनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “बेंड इडली वडा राम चरण, तू कुठे आहेस? राम चरणसारख्या कलाकाराचा इतका अनादर”. यापुढे तिने दक्षिणेकडील कलाकारांचे कौतुक किंवा आदर कसा केला जात नाही याबद्दल “हे विचित्र आहे की प्रत्येकजण आम्हाला कमी पैसे देऊ इच्छितो. कारण आम्ही दक्षिण भारतीय आहोत, याउलट अभिनेता दिल्ली किंवा मुंबईचा असेल तर त्याच गोष्टीसाठी अभिनेत्याला तिप्पट रक्कम देणे योग्य मानले जाते.” असं म्हणत निराशा व्यक्त केली आहे.
Shahrukh Khan is being racist to South Indians by calling "Ram Charan idli" after a South Indian director gave him the biggest hit of his career#ShahRukhKhan #RamCharan pic.twitter.com/Vc5mcg7dLm
— BHAI (@salmanbhaijaann) March 4, 2024
आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : कोणत्या राशीसाठी आजचा दिवस असणार आहे अगदी खास?, भरपूर होईल धनलाभ, जाणून घ्या…
दरम्यान, राम चरणच्या काही चाहत्यांनीही शाहरुखवर टीका करत असं म्हटलं आहे की, “शाहरुख खान दक्षिण भारतीय राम चरणला इडली म्हणत त्याच्याशी वर्णद्वेषी वागतो आहे, एका दक्षिण भारतीय अभिनेत्याने त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट दिल्यानंतर, शाहरुख खान दक्षिण भारतीयांना ‘राम चरण इडली’ म्हणत त्यांच्याशी वर्णद्वेषी वर्तन करत आहे.”