सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतरच्या बायकोच्या पहिल्या वाढदिवसाला प्रथमेश परबने दिलं सरप्राइज, जंगी सेलिब्रेशन केलं अन्…; म्हणाला, “तुझं हसणं, रडणं, रुसणं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 5, 2024 | 10:44 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Parab Wife Birthday

लग्नानंतरच्या बायकोच्या पहिल्या वाढदिवसाला प्रथमेश परबने दिलं सरप्राइज, जंगी सेलिब्रेशन केलं अन्...; म्हणाला, "तुझं हसणं, रडणं, रुसणं..."

बरेच दिवसांपासून सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच प्रेक्षकांच्या लाडक्या दगडूने लग्नगाठ बांधली आहे. काही दिवसांपूर्वी प्रथमेश परबने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्न केले. अगदी शाही थाटामाटात प्रथमेश व क्षितिजा यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. प्रथमेश व क्षितिजा यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यांच्या लग्नसोहळ्याबरोबरच त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींचे फोटोही समोर आले. दोघांच्या हळदीच्या फोटोंनी, व्हिडीओने तर अक्षरशः धुमाकूळ घातला. (Prathamesh Parab Wife Birthday)

बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश व क्षितिजा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत दोघांनी साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्यातीलही रोमँटिक फोटो चांगलेच चर्चेत राहिले. प्रथमेश व क्षितिजा यांनी अगदी साध्या पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा उरकला. लग्नानंतर ही जोडी कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत लोणावळा येथे फिरायला गेली होती. तेथे मनसोक्त फिरतानाचे अनेक व्हिडीओ, फोटो त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअरही केले होते.

आणखी वाचा – ठाण्यामध्ये स्वतःचा दवाखाना सुरु केला; पण दत्तू मोरेच्या पत्नीने कोणत्या विषयामध्ये मिळवली डॉक्टरची पदवी?, कुटुंबात आनंदाचं वातावरण

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

लग्नानंतर ही प्रथमेश व क्षितिजा त्यांच्या संसारात रमलेले दिसले. तर क्षितिजाही तिच्या सासरी रमलेली दिसत आहे. अशातच लग्नानंतर आता प्रथमेशच्या पत्नीचा पहिला वाढदिवस तिच्या सासरच्या घरी साजरा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर प्रथमेशने त्याच्या बायकोचा साजरा केलेल्या वाढदिवसाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यांत अगदी रात्री बारा वाजता क्षितिजाला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर क्षितिजासाठी आणलेल्या केकवर मिसेस. परब असं लिहिलं होतं. शिवाय केक कट केल्यानंतर तिला सरप्राईज गिफ्टही दिल आहे. प्रथमेशने बायकोला डायमंडची चैन व अंगठी व ब्रेसलेट गिफ्ट केलं आहे. तर तिच्या सासूबाईंनी सूनेचं औक्षण करत तिला शुभेच्छा दिल्या आहे.

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : कोणत्या राशीसाठी आजचा दिवस असणार आहे अगदी खास?, भरपूर होईल धनलाभ, जाणून घ्या…

हा व्हिडीओ शेअर करत प्रथमेशने या व्हिडिओला दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे. “हॅपी बर्थडे बायको. बायको म्हणताना खूपच वेगळ वाटतं, आपल वाटतं. तुझ असणं, हसणं, रडणं, रुसणं, समजून घेणं, समजावणं, सतत हसत राहणं, लोकांना ही हसवत ठेवणं, सगळचं खूप भारी आहे. थँक यु या सगळ्या गोष्टींसाठी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत त्याने बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: entertainmentprathamesh parabPrathamesh Parab Kshitija Ghosalkarprathamesh parab weddingPrathamesh Parab Wife Birthday
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Rakesh Poojary Death
Entertainment

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्…

मे 12, 2025 | 4:05 pm
Next Post
Ram Charan fans angry after Shah Rukh Khan called Ram Charan an idli

“बेंड इडली वडा राम चरण”, शाहरुख खानच्या ‘त्या’ विधानामुळे राम चरणच्या चाहत्यांचा संताप, वर्णद्वेषी असल्याचा किंग खानवर आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.