ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीत केली जातात. दैनंदिन राशिभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक व वार्षिक राशिभविष्य हे अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालींवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब व मित्रांसोबतचे संबंध, आपले आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. चला तर जाणून घेऊयात कोणत्या राशींसाठी आजचा (मंगळवार) दिवस भाग्यशाली असणार आहे.
मेष : धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. यशस्वी व्हाल. योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. मनोबल उंचावलेले असेल. प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल.
वृषभ : संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ताणतणाव जाणवेल. युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे.
मिथुन : आज कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होईल. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे. अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक अवस्था उत्तम राहील. मात्र अतिउत्साह टाळा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील.
कर्क : करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नवीन कल्पना नक्की मांडा.
सिंह : आज घरात आणि कामाच्या ठिकाणी वाद आणि भांडणे टाळणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे तुमच्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते. स्वतःच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असे कोणतेही काम करू नका. आरोग्याची काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. आज काही नवीन गोष्टी शिकाल.
कन्या : रखडलेल्या कामांच्या बाबतीत थोडे चिंताग्रस्त असाल. याविषयी तुम्ही तुमच्या मित्रांशी चर्चा कराल. कामाच्या ठिकाणी कोणी तुम्हाला फसवू शकतं. त्यांच्यापासून तुम्हाला सावधान राहावे लागेल. तुम्ही तुमच्या कामापेक्षा इतरांच्या कामात उगीच लक्ष घालाल ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल.
तुळ : तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कौटुंबिक जीवनातील लोक आपल्या जोडीदारासोबत काही वेळ घालवतील, त्यांचे विचार ऐकतील आणि समजूनही घेतील.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम ठरणार आहे. पण भागीदारीत कोणतेही काम सुरू करू नका नाहीतर त्याचा तुम्हाला त्रास होईल. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी योग्य सिद्ध होईल.
धनु : चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. एखाद्या योजनेचा पूर्ण फायदा तुम्हाल मिळू शकतो.
मकर : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेत चांगला ठरणार आहे. तुम्ही घरगुती मुद्द्यांवर चिंताग्रस्त असाल यासाठी तुम्हाला एखाद्या बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. जर तुम्हाला एखाद्या मोठ्या गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुम्हाला मोकळेपणाने गुंतवणूक करायला हरकत नाही.
कुंभ : व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना आज खूप त्रास होणार आहे. त्यांचे सहकारी त्यांच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. तुमच्या कुटुंबात नवीन पाहुण्याच्या येण्याची चाहूल लागेल ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी होईल.
मीन : मीन राशीच्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस उत्तम जाणार आहे. जर त्यांनी एखादी परीक्षा दिली असेल तर त्यांना समाधानकारक आणि आनंददायक निकाल मिळतील. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. तुमची उर्जा तुम्ही चांगल्या कामात लावणे सगळ्यात योग्य ठरेल. ती उर्जा वायफळ कामात व्यर्थ घालवू नका.