शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्यावर केले गंभीर आरोप, संजय दत्तचीही आहे वहिनी पण…; ‘हम आपके हैं कौन’मधील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या काय करते?

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 29, 2024 | 7:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hum Aapke Hai Kaun actress

नवऱ्यावर केले गंभीर आरोप, संजय दत्तचीही आहे वहिनी पण...; 'हम आपके हैं कौन'मधील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या काय करते?

‘हम आपके है कौन’ या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाने सर्वांनाच भुरळ घातली होती. आया इतके वर्ष झाली तरीही या चित्रपटाची जादू कमी झालेली नाही. चित्रपटाच्या कथेबरोबरच त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी ऐकायला मिळतात. सलमान खान व माधुरी दीक्षित यांच्या जोडीला  अधिक प्रेम मिळाले होते. पण त्यातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे ‘रिटा’. साहिला चड्ढा यांनी रिटाची भूमिका साकारली होती. सध्या त्या काय करतात हे जाणून घेऊया. (Hum Aapke Hai Kaun actress)

१९९४ मध्ये ‘हम आपके हा कौन’ला कौटुंबिक चित्रपट म्हणून चांगलेच डोक्यावर घेतले होते. यामध्ये रिटा ही ‘प्रेम’ म्हणजे सलमानवर एकतर्फी प्रेम करणारी आणि त्याच्याशी लग्न करण्याची स्वप्न बघत होती. तिने केलेल्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते तसेच पसंतही केले गेले होते. साहिलाने वयाच्या १०व्या वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली होती. तिने ‘मिस इंडिया’चा किताबही जिंकला होता. हा किताब जिंकण्याआधी रिटाने अनेक चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या होत्या. सुरुवातीच्या काळात तिने कन्नड, तमिळ व भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण आज ३० वर्षानंतर साहिलाला ओळखणे कठीण झाले आहे.

आणखी वाचा – “दारु खूप प्यायचे आणि…”, अश्लील आरोपांनंतर ‘संस्कारी बाबूजी’ अलोक नाथ आता कोणत्या अवस्थेत आहेत?, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, “मला त्यांनी…”

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

२००८ पर्यंत साहिलाने चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या १६ वर्षापासून ती अभिनयापासून लांब आहे.सध्या ती प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करत आहे. साहिलाने प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचा भाऊ  निमाई बालीबरोबर विवाह केला. त्यांना एक मुलगीही आहे. पण लग्नाच्या काही वर्षानंतर मात्र पतीकडून मारहाण होत असल्याचा आरोप तिने केला होता. नंतर या सर्व प्रकाराला कंटाळून निमाई यांनी घर सोडले. तिने निमाई हे मुलीला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता. पण यामध्ये किती तथ्य आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आणखी वाचा – मुकेश अंबानी यांच्या घरातील कचऱ्याचं नेमकं काय होतं?, अंबानी कुटुंबियांचं कचरा कुठे फेकला जातो?, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

साहिला आतापर्यंत ‘बोल राधा बोल’, ‘चांद का तुकडा’, ‘दौलत की जंग’, ‘मां’ या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. सध्या त्या स्वतः वेडिंग प्लॅनर व इंटिरियर डिझायनर म्हणूनही काम करत असल्याचे सांगतात.

Tags: hum aapke hai kaunhum aapke hai kaun moviemadhuri dixitsalman khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Usha Naik Statement

"माझ्यावर भरपूर अन्याय झाला…", सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, "पुरस्कार न मिळणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.