‘हम आपके है कौन’ या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाने सर्वांनाच भुरळ घातली होती. आया इतके वर्ष झाली तरीही या चित्रपटाची जादू कमी झालेली नाही. चित्रपटाच्या कथेबरोबरच त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी ऐकायला मिळतात. सलमान खान व माधुरी दीक्षित यांच्या जोडीला अधिक प्रेम मिळाले होते. पण त्यातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे ‘रिटा’. साहिला चड्ढा यांनी रिटाची भूमिका साकारली होती. सध्या त्या काय करतात हे जाणून घेऊया. (Hum Aapke Hai Kaun actress)
१९९४ मध्ये ‘हम आपके हा कौन’ला कौटुंबिक चित्रपट म्हणून चांगलेच डोक्यावर घेतले होते. यामध्ये रिटा ही ‘प्रेम’ म्हणजे सलमानवर एकतर्फी प्रेम करणारी आणि त्याच्याशी लग्न करण्याची स्वप्न बघत होती. तिने केलेल्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते तसेच पसंतही केले गेले होते. साहिलाने वयाच्या १०व्या वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली होती. तिने ‘मिस इंडिया’चा किताबही जिंकला होता. हा किताब जिंकण्याआधी रिटाने अनेक चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या होत्या. सुरुवातीच्या काळात तिने कन्नड, तमिळ व भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण आज ३० वर्षानंतर साहिलाला ओळखणे कठीण झाले आहे.
२००८ पर्यंत साहिलाने चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या १६ वर्षापासून ती अभिनयापासून लांब आहे.सध्या ती प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करत आहे. साहिलाने प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचा भाऊ निमाई बालीबरोबर विवाह केला. त्यांना एक मुलगीही आहे. पण लग्नाच्या काही वर्षानंतर मात्र पतीकडून मारहाण होत असल्याचा आरोप तिने केला होता. नंतर या सर्व प्रकाराला कंटाळून निमाई यांनी घर सोडले. तिने निमाई हे मुलीला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता. पण यामध्ये किती तथ्य आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
साहिला आतापर्यंत ‘बोल राधा बोल’, ‘चांद का तुकडा’, ‘दौलत की जंग’, ‘मां’ या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. सध्या त्या स्वतः वेडिंग प्लॅनर व इंटिरियर डिझायनर म्हणूनही काम करत असल्याचे सांगतात.